कंधार ; प्रतिनिधी
शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या संपर्क कार्यालयात कंधार येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस आज रविवार दि.१८ जुलै रोजी अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छत्रू महाराज, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती राजकुमार केकाटे, राष्ट्रवादी ओ.बी.सी सेल तालुकाध्यक्ष न्यानोबा घुगे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष संतोष कागणे आदीची यावेळी उपस्थिती होती.