कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील उस्माननगर या गावी जन्म घेतलेले भूमिपुत्र व सोलापूर येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्यायमूर्ती एस. एस.काझी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची जन्मभूमी असलेल्या कंधार तालुक्यातील नंदनवन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती श्री एस. एस. काझी म्हणाले की मी देखील अशाच प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले आहे व तुमच्याच प्रमाणे कुठेतरी रांगेत बसत होतो व मी मला स्वतःला तुमच्यात शोधत आहे तसेच पुढे ते म्हणाले की कठोर मेहनत केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही व कठोर मेहनतीस दुसरा कोणताही पर्याय नाही तरी तुम्ही खूप अभ्यास करा व मोठे व्यक्ती होऊन देशाची सेवा करा असा कानमंत्र न्यायमूर्ती आणि विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी नंदनवन येथील गावकऱ्यांच्या वतीने न्यायमूर्ती श्री एस एस काझी साहेब यांचा पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन व केक कापून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वाढदिवस साजरा करण्यात आला. न्यायमूर्ती श्री एस एस काझी यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड.अन्सारी जिल्हा न्यायालय नांदेड येथील वकील ॲड जफर हे उपस्थित होते.त्यांचा देखील याप्रसंगी पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष ,गुरुनाथ पाटील हुंबाड सरपंच ग्रामपंचायत नंदनवन, तिरुपती पाटील भागानगरे जिल्हा सल्लागार तसेच श्री सोनकांबळे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदनवन चे मुख्याध्यापक सौ. पाटील मॅडम ,सौ. निखाते मॅडम ,श्री जोशी सर ,श्री देशमुख सर ,श्री निर्मले सर श्री पवार सर श्री शिरसागर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी नंदनवन गावचे तंटामुक्ती अध्यक्ष धोंडीबा खांदाजे, परशुराम बेलदार ,मधुकर भागानगरे ,बालाजी भागानगरे, शिवाजी सावकार ,उत्तमराव भागानगरे ,प्रकाश वाघमारे, विलास हुंबाड ,माधव कुलकुलवाड, परमेश्वर भागानगरे ,जयसिंग भागानगरे, नारायण भागानगरे ,व्यंकटराव भागानगरे, आनंदराव हुंबाड, नारायण बाळापुरे, प्रल्हाद खांदाजे ,ॲड.नितीन इंगळे, दिगंबर वाघमारे ,प्रकाश भागानगरे ,पांडुरंग भागानगरे हे उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सौ पाटील मॅडम यांनी केले तर सदरील कार्यक्रमाचे संयोजक हे प्रदीप पाटील हुंबाड मराठा महासंग्राम संघटना जिल्हाध्यक्ष नांदेड यांनी केले . या कार्यक्रमास गावातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.