राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही; कधी कधी तर ध्येयपूर्ती होणार हे जवळपास निश्चित असते पण अचानक असे काही घडते की नाईलाज होतो आणि विजयी माळ आपल्या हाताने इतरांच्या गळ्यात घालावी लागते .असा वेळी श्रद्धा -सबुरी ठेवून निर्णय घेणार नेतृत्व कसोटीवर उरते आणि कोणतीही आदळआपट न करता आदेश शिरसंवाद मानून अवघ्या आठ दिवसात विधानसभेची विजयश्री मामांसाठी खेचून आणणारे नेतृत्व जिल्ह्याच्या राजकारणात सापडणार नाही.पण लोहा कंधार चे युवा नेतृत्व प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कमी वयात खूप काही शिकले . डावपेच -रणनीती मध्ये तरबेज असलेल्या या युवा नेतृत्वाचा आज (४ अॉगस्ट) वाढदिवस. त्यानिमित्ताने लोहा कंधार मतदार संघात नवचैतन्य निर्माण झाले आहे.आगामी विधानसभा निवडणुकी साठी चिखलीकर कुटुंबियांने जनतेच्या मनातील संभ्रम दूर केला आहे
.
लोहा- कंधार तालुका हा जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला.विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी आमदार होण्याची संधी प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सोडली .त्यांच्या या त्यागाची- संयमाची खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली. राजकारणा मुळे .कुटुंबात “वाद” नको.असे म्हणत प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतली.प्रचार काळात शिवसेना उमेदवार ऍड मुक्तेश्वर धोंडगे यांचा विजय होणार (?) अस वातावरण मतदारसंघात सुरू होते.प्रचार यंत्रणा जबरदस्त होती.मागील पराभव झाला त्यामुळे सहानुभूती होती.तर भाजप-शिवसेना युती मुळे खासदार प्रतापरावांना थेट प्रचार करण्याच्या अनेक अडचणी होत्या( शिवसेना भाजपयुती) .पण शेवटच्या आठ दिवसात प्रवीण पाटील यांनी सगळी सूत्रे हाती घेतली.संपूर्ण मतदारसंघाची खडानखडा माहिती शिवाय कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ .त्यामुळेच १९९५ नंतर शेकाप चा गाडा -मुंबईला धाडा.. यशस्वी होऊ शकला.
. २००९ च्या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर अशी लढत राज्यभर गाजली .या निवडणुकीत स्वतः प्रवीण पाटील यांनी सर्व नियोजन केले होते . मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ निवडणूक लढविणे लेचपेचाचे काम नव्हते…जागोजागी अडवणूक. पोलीस कार्यवाही या सगळ्याला तोंड देत कार्यकर्ते -जनता यांच्या पाठबळावर त्या निवडणूकीत चिखलीकर परिवाराने मोठ्या धीरोदत्तपणे याचा सामना केला .थोडक्यात विजय हुकला .या सर्व घडामोडीत प्रवीण पाटील चिखलीकर यांनी जे अनुभव घेतले ..ज्या राजकीय डावपेचांना तोंड दिले..ते सहन केले .ही सहनशक्ती..संयम.- – सहकार्य त्यांच्या राजकीय जीवनात उपयोगी पडते आहे.
.त्यानंतर त्यांनी स्वतः वडेपुरी ची जिल्हा परिषद निवडणूक लढविली.सर्व विरुद्ध चिखलीकर अनुभव तसा नवा नव्हता त्यामुळे स्वतः प्रवीण पाटील यांनी गावोगावी जाऊन स्वतः नियोजन करीत यशश्री मिळविली.त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री विरुद्ध चिखलीकर अशीच लढत झाली.पुढे कंधार -लोहा नगरपालिका, दुसऱ्यांदा जिल्हा परिषद शिराढोण ,व प्राणिताताई यांचा वडेपुरी गट या सगळ्या निवडणूकीत आणि २०१४ च्या चिखलीकर साहेबांच्या ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीत प्रवीण पाटील यांचे नियोजन ” हमखास ” विजय घेऊन आले.पुढे लोकसभा निवडणुक ..बहुतेक मतदार संघात नवीन ..नवे कार्यकर्ते..नवा पक्ष..नवे संघटन या सगळ्याची अतिशय व्यवस्थित सांगड घालीत या युवा नेत्यांनी राज्यात लक्ष्यवेधी विजय मिळवून देण्यास सिंहाचा वाटा उचलला.त्यातच पंतप्रधानमोदी साहेब यांचे सभेला गर्दी जमविण्यासाठी लागणारे कसब प्रवीण पाटील यांनी मोठ्या खुबीने वापरले.आणि सभा विजयी ठरली. ही अतिशयोक्ती नव्हे तर हे वास्तव आहे.प्रवीण पाटील बोलत नाहीत तर करून दाखविता..एक असा युवा नेता की जो मोठ्या माणसांचा अतिशय आदर करतो ..वडीलधा ऱ्यांनी , अधिकाऱ्यांनी हाक मारली तर . “जी” म्हणणार . असा नम्र स्वभाव .विरोधकांनाचा प्रवीण पाटील नेहमीच आदर करतात.राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री करतात व टिकवितात. सोशल मीडियावर विरोधात आलेल्या कमेंटवर कधीच त्या व्यक्तींना अपशब्द काढला नाही
पण “विद्यमान” यांनी तर सरळ- सरळ पाहून घेईल म्हणणे सुरू केले आहे..याची मतदारसंघात तुलना सुरू आहे,
प्रवीण पाटील म्हणजे संयम, आदरभाव, समयसूचकता , व धाडसी निर्णयक्षमता , राजकीय रणनीती , संघटन, मिस्कील स्वभावाचा जिवलग मित्रत्व जपणारा युवा नेतृत्व होय , म्हणून त यांची “ताकद” कळत नाही खुद्द मामाश्री सेवानिवृत्त सनदी अधिकारी आ श्यामसुंदर शिंदे साहेबानाही कदाचित प्रवीण पाटील कळले नसावेत
विधानसभा निवडणुकीत स्वतः आमदारकी आपल्या नेत्यांच्या आदेशानुसार लढविली नाही उलट
अठरा महिन्यांपूर्वी पूर्ण ताकद लावून सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निवडून आणले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आले आणि लोहा कंधार मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे जुळली..ज्यांनी निवडून आणले तेच विरोधक असे आ. शिंदे व समर्थक मानायला लागले .
तन-मन-धनाने प्रवीण पाटील आणि प्राणिताताई या बहीण भावाने आपली सर्वच यंत्रणा कामाला लावली . यांची स्वप्नपूर्ती झाली
ऐतिहासिक विजय झाला. निवडणूक काळात जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा श्री शिंदे यांना विरोध होता.पण टीम प्रवीण पाटील यांनी एकतर्फी विजय खेचून आणला .ही वस्तुस्थिती .
आ शिंदे यांनी जाहीरपणे चिखलीकर साहेबांवर टीका सुरू केली त्यांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी पूर्ण ताकद लावली.( चिखली, कंधार, घटना….) तरीही युवा नेते प्रवीण पाटील व प्रणिताताई या बहीण भावाने एकही शब्द काढला नाही.संयम ढळू दिला नाही .. त्या दोन्ही घटने नंतर सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी प्रवीण पाटील चिखलीकर पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले तेथे “नातं ” गौण ठरलं आणि कार्यकर्ता हेच नाते दृढ झाले
राजकीय डावपेचात ” मामा” पेक्षा ‘भारी ” आणि त्यांच्या विजयी रथाचे ” सारथ्य ” केलेले युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी मौन सोडले .मामाश्री (आमदार शिंदे )यांच्या विरुद्ध विधानसभे साठी दंड थोपटले आणि कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला. अठरा महिन्यात मतदारसंघातील लोकांचा -कार्यकर्त्यांचा-विरोधकांचाही भ्रमनिरास झाला आहे
.राजकीय डावपेचांची समयसूचकता व विरोधकांना आपलेसे करणारे हे युवा नेतृत्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवार आहेत.
. चिखलीकर-आ शिंदे परिवार पुन्हा एकत्रित होतील .व शिंदे यांच्या पाठीशी प्रतापरावांची ताकद पुन्हा उभी राहील या सगळा “जर-तर” पर्यंतची चर्चा..एकदा घडलेल्याची राजकारणात पुनरावृत्ती होत नाही..लोहा -कंधार तालुक्यात ते पुन्हा होणार नाही .सर्व काही पैशावर चालत नाही .आज मतदार संघातील लोका पश्चाताप करीत आहेत. केवळ चिखलीकर साहेबांकडे पाहून निवफणुकीत सहकार्य केल्याचे विद्यामान याना उपकार राहिले नाहीत .काम सरो ..वैद्य …! अशी त्यांची नीती… पण आता खंबीर नेतृत्व असलेले प्रवीण पाटील ” आमदार “म्हणून लोकांना हवे आहेत त्यासाठी तेही सज्ज झाले आहेत.त्याच्या पाठीशी चिखलीकर साहेबांची मोठी पुण्याई आहे.त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने प्रवीण पाटील व टीम निवडणूकी साठी तयार सुरू केली आहे.
..स्वतः प्रवीण पाटील यांच्याकडे स्वतःच्या कडे निवडणूक लढविण्याचा मोठा अनुभव आहे .मामा विरुद्ध भाचा या नव्या राजकीय लढतिचा आरंभ झाला आहे . प्रवीण पाटील एक कसलेले युवा नेतृत्व आहे.त्यांची ” रणनीती ” जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या डावपेचांना ” शह” देणारी असते..डावपेचात आणि विरोधकांना जवळ करण्यात या युवा नेत्यांचा ” हातखंड” भारी आहे. जनतेची त्यांना साथ हवी आहे .मी जनतेचा – जनता माझी ” यासाठी पुन्हा एकदा जनाधार असलेल्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. मतदार संघ पुन्हा एकदा चिखलीकर कुटुंबियांनी नेतृत्व करावे या मोठ्या आशेने पाहतो आहे
वाढदिवसाच्या निमित्ताने प्रवीण पाटील चिखलीकर याना उदंड दिर्घआयुरोग्य लाभो.
यशवंत व्हा..! किर्तीवंत व्हा..!