नांदेड ; जागतिक कीर्तीचे महान साहित्यिक, थोर समाज सुधारक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती मौजे वाघी ता.नांदेड येथे मोठ्या थाटामाटाने संपन्न झाली या कार्यक्रमाप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले व,याप्रसंगी प्रदिप वाघमारे अध्यक्षस्थानी बोलत असताना मातंग समाजाने व मातंग समाजातील युवक बांधवांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे परिवर्तनवादी विचार आत्मसात करून समाजाची दिशा ठरवली पाहिजे आणि संघर्ष करून आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे आपल्या मागण्या आणि न्याय हक्कासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप भाऊ वाघमारे लहुजी शक्ती सेना नांदेड जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ. प्रमुख वक्ते म्हणून सन्माननीय शिवा कांबळे श्री सोनू दरेगावकर व प्रमुख पाहुणे म्हणून नागोराव आबंटवार लहुजी शक्ती सेना मराठवाडा युवक अध्यक्ष,प्रीतम गवाले लहुजी शक्ती सेना मराठवाडा उपाध्यक्ष, संतोष भाऊ सूर्यवंशी कोर कमिटी जिल्हाध्यक्ष नांदेड मारुती भाऊ वाघमारे लहुजी शक्ती सेना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मारुती भाऊ वाघमारे ,ऑटो युनियन जिल्हा उपाध्यक्ष श्री आनंद पाटील गारोळे, धर्मवीर शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष. बालाजी मेकाले ,नांदेड तालुका अध्यक्ष नरेश गजले लोहा तालुका उपाध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख लोहा, दिगंबर झुंजारे पृथ्वीराज अहिलवार आणि वाघी येथील सरपंच आणि वाघी येथील समाज बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वाघी येथील लहुजी शक्ती सेना व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.