सिडको नांदेड ;
४ ऑगस्ट याच दिवशी ४३ वर्षी पूर्वी नामांतर चळवळीत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या नामांतर वीर शहीद पोचिराम कांबळे आणि शहीद चंदर कांबळे यांना क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड ,भारतीय लहुजी सेना आणि रयत सेवाभावी संस्था या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,नामांतर शहीद पोचिराम कांबळे ,शहीद चंदर कांबळे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने छोटीशी भेट म्हणून साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी कांबळे कुटुंबातील सदस्या शहीद वीर पत्नी धोंड्यामाय पोचिराम कांबळे यांच्या तब्बेतीची विचारपूस करून साडी भेट देण्यात आली. यावेळी उपस्थित आयु.सुरेखाबाई चंदर कांबळे,नात मीना मोरे,रयत सेवाभावी संस्थेचे संचालक ,राज्यउपाध्यक्ष,
भाकपा(युनायटेड)चे कॉ. प्रा.इरवंत सुर्यकार,जिल्हामहासचिव कॉ. प्रा.देवीदास इंगळे,भारतीय लहुजी सेना चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.रणजित बाऱ्हाळीकर,जिल्हाध्यक्ष कॉ. गोपाळ वाघमारे,कॉ. दर्शन इंगळे, सामाजिक कार्यकर्ते कॉ.रिंकू सावळे आदी उपस्थित होते.