जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कलंबर येथे कोरोना योध्दांचा सत्कार

लोहा ; प्रतिनिधी

शांतिदूत प्रतिष्ठान, ता. कंधारच्या वतीने कलंबर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जि. प. सदस्य तथा युवानेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दि.१० रोजी कोरोना योध्दांचा करण्यात आला.

कार्याक माच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स. सभापती बाबू आप्पा मुक्कनवार, उद्घाटक म्हणून दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य साहेबराव काळे, प.स.सभापती आंनद पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती लक्ष्मण बोडके, शंकर पाटील ढगे, भाजपा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, उत्तमराव कौडलवाडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.शेषराव लोहगावे, युवा नेते सचिन मुकदम, सुर्यकांत गायकवाड, भानुदास पाटील पवार, प्रविण धुतमल, अंकुश
पाटील कदम, अभंग पाटील गाडेकर, विठ्ठल सोनकांबळे, कंधारचे नगरसेवक निलेश गौर आदींसह कलंबर सर्कल मधील आरोग्य कर्मचारी, अधिकारी, आशा वर्कर अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी प्रविण पाटील म्हणाले की, कोरोना काळात ह्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. कारण कोरना काळात मी व माझे कुटुंब यांनी त्या वेदना भोगल्या आहेत. त्यामुळे स्वतः चे नातेवाईक या काळात जवळपास आले नाहीत. तेव्हा कोरोना बाधितांची याच कोरोना योद्धांनी काळजी घेतली. त्यामुळे आम्ही त्यांचा हा सन्मान करतो आहोत. यात कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही. कंधार, लोहा येथील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये जाऊन आम्ही त्यांचा शांतिदूत प्रतिष्ठानच्या वतीने चार तारखेपासून ते चोवीस तारखे पर्यंत हा कार्यक्रम राबविणार असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी केले. तर सुत्रसंचलन विक्रम कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *