नांदेड ; प्रतिनिधी
लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनु.जाती आरक्षण अ.ब.क.ड.वर्गीकरण करण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात लोकस्वराज्य आंदोलन मागील सतरा वर्षापासून शोषणमुक्त निर्मितीचा संकल्प घेऊन अनु.जाती,जन जाती,शोषित- पिडीत समुहांच्या अधिकार आणि हक्कासाठी लढत असुन,विशेष करून अनुसूचित जाती आरक्षणाचे समन्यायी वितरण झाले पाहिजे,
यासाठी महाराष्ट्रात अनेकवेळा विविध आंदोलन करण्यात आले असले तरीही महाराष्ट्राच्या चालु आणि मागील सरकारने अनुसुचित जाती आरक्षण लाभवंचिताना त्यांचे हक्क,अधिकार अनुसूचित जाती अ.ब.क.ड आरक्षण वर्गिकरण करण्यात यावे यासाठी कोणत्याही सरकारने वंचित,शोषीतांच्या न्यायाची भुमिका न घेता हेतुपुरस्पर दुर्लक्ष करण्यात आले.
कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून पदाधिकारी बैठक आयोजित करता आली नाही,तरी अनुसूचित जाती आरक्षण वर्गिकरण लढ्यासाठी पुढील रणनिती ठरवण्यासाठी व पदाधिकारी कार्यकारीणी निवड करणे यासाठी शासकीय श
विश्रामगृह नांदेड येथे दि.१६ आॅगष्ट २०२१ रोजी लोकस्वराज्य आंदोलनाची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले
या बैठकीस युवक प्रदेश अध्यक्ष अॅड दत्तराज गायकवाड, रावसाहेब दादा पवार (प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडी),प्रदेशउपाध्यक्ष व्हि.जी.डोईवाड,प्रदेश सरचिटणीस नामदेवराव गायकवाड, जेष्ट मार्गदर्शक एन.जी.नामेवार,एन.जी.पोतरे, डि एन शेलके, महिला आघाडी द्रोपदाताई कांबळे, आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकस्वराज्य आंदोलनाच्या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा संघटक संतोष तेलंग,जिल्हा प्रवक्ता नागोराव कुडके ,युवक जिल्हाध्यक्ष अंकुश गायकवाड,दक्षिण जिल्हा कोअर कमिटी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टिकेकर,
संभाजी वाघमारे,निवृत्ती गायकवाड,लक्ष्मण गायकवाड,सचिन वाघमारे,
आदी पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.