कंधार ; उमर शेख
चांगली भावना डोळ्यासमोर ठेवून प्रा.डी.सी.पवार व त्यांच्या सहका-यांनी कै.भुराबाई पवार प्रतिष्ठानची स्थापना केली आहे.त्या माध्यमातून सप्तश्रंगी देवीच्या मंदीराचा भुमिपुजन सोहळा आज पार पडतोय ही अत्यंत आनंदाची बाब आहे.आपल्या आईच्या स्मृति जाग्या ठेवण्यासाठी हे प्रतिष्ठान काम करणार आहे.प्रा.डी.सी. पवार यांना त्यांच्या आईने अत्यंत गरीबीतून व कष्टातुन शिकवीले.या घटनेचीआठवण या नीमित्ताने होते.या कामासाठी मी माझ्या आमदार नीधीतुन पाच लाख रुपये देतो.आपण सर्वानी ही या कामाला मदत करावी.भविष्यात ही या कामी काही मदत लागल्यास आपण करु.कै.भुराबाई पवार प्रतिष्ठानने भविष्यात ही समाजाभिमुख कार्यक्रम हाती घ्यावेत असे प्रतिपादन मुखेड कंधार मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ.तुषारजी राठोड यांनी वर्ताळा तांडा ता.मुखेड येथे सप्तशृंगी देवी मंदिर भुमिपुजन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथिल प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की प्रत्येक गाव आणि तांड्याचा विकास व्हावयाचा असेल तर त्यासाठी दिशादर्शकाची आवश्यकता असते.या तांड्यात हे काम हे प्रतिष्ठान करणार आहे याचा मला मनस्वी आनंद वाटतो. या माध्यमातून ग्रंथालय उभारणी व्हावी,वृक्षारोपण व्हावे.विविध शिबीरांचे आयोजन करण्यात यावे.या कामी आम्ही राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहकार्य देवु.
या वेळी मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने म्हणाले की जी माणसे माता आणि मातृभुमीवर प्रेम करतात ती माणसे ख-या अर्थाने भारतीय सँस्कृतीचे वाहक आसतात.ते काम प्रा.डी.सी. पवार करताहेत.महाराष्ट्रातील साढे तीन पीठापैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे मंदिर इथे होत आहे.ही आनंदाची बाब आहे.आपल्या आईला अशा कार्यक्रमांतून जीवंत ठेवण्याचे काम इथे होत आहे.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संयोजक प्रा.डी.सी. पवार म्हणाले की माझ्या आईने मला अत्यंत कष्टातुन व गरीबीतुन शिकवीले.ती मी लहान असतानाच गेली.मला तीची सेवा करता आली नाही.त्या काळी साधा फोटो ही घेता आला नाही.ती जरी आज शरीराने गेली आसली तरी या प्रतिष्ठानकडून विविध उपक्रम राबवुन तीला जिवंत ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत.जननी आणि जन्मभुमिसाठी काहीतरी केले पाहिजे या उद्येशानेच हे काम आरंभीले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी या मंदिराचे भुमिपुजन मा.आ.डॉ.तुषार राठोड साहेबांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी पं.स.सभापती प्रतिनिधी लश्मण पाटील खैरकेकर,प्राचार्य डॉ.हरिदास राठोड,वि.जा.से.स.वसंतनगरचे सदस्य मुख्या.गोविंद पवार,प्राचार्य दिलीप गायकवाड,मुख्या.अंगद मैलारे,मुख्या.गोविंद चव्हाण,मुख्या.रामराव राठोड,सरपंच सूर्यकांत शेळके,उपसरपंच राजू राठोड,माजी सरपंच दशरथ राठोड सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सूरुवातीला राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तदनंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न करण्यात आला.
सूत्रसंचलन भारत जायभाये यांनी केले तर आभार रमेश डावकरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त शिक्षक मोहन राठोड,श्याम राठोड,सूधाकर राठोड,संजय पवार व अन्य मान्यवरांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमास प्रा.एस.बाबाराव,प्रा.डॉ .उमाकांत पदमवार,प्रा.डॉ.नागोराव आवडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.