कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहरात एकमेव मुख्य रस्ता असून त्यावर ग्रामीण व शहरी वाहतूक मोठ्या प्रमाण असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करून मार्ग काढावा असे निवेदनाद्वारे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना भाजपा शहराध्यक्ष ॲड.गंगाप्रसाद यन्नावार यांनी आज दि. १८ रोजी केली आहे.
कंधार शहर व तालुका डोंगराळ असल्याने येथील भौगोलिक रचना ही चढ – उताराची आहे,त्यामुळे रस्ते पण वळणदार व चढ उताराचे आहेत.त्यामुळे वाहनांना अति वेग येतो काही वेळा ब्रेक निकामी झाल्यास वेग वाढून अपघात होतात.
गतवर्षी शहरातील महाराणा प्रताप चौक येथे मोठा अपघात झाला त्यात सुदैवाने जिवित हानी झाली नाही तसेच यावर्षी दि १६ रोजी झालेल्या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला व अनेकांना गंभीर दुखापत झाली या वारंवार होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी या संबंधित विभागाची तज्ञांची समिती गठीत करून भविष्यात असे अपघात होणार नाहीत या साठी उपाय योजना करावी असे निवेदनाद्वारे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना मागणी केली आहे .
या निवेदनात शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण,अरुंद रस्ते,रस्त्यावर थांबणारी वाहने,रस्त्याची दुरावस्था, आठवडी बाजार,बेशिस्त वाहन चालवणे,आपातकालीन वैधकीय व्यवस्था,वाहतूक पोलीस चौकी यादी बाबत उपाययोजना करून जीवित व वित्तहानी टाळावी असे निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनावर भाजपा तालुध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार,भाजुमोचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,शहर सरचिटणीस मधुकर डांगे,प्रवीण बनसोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवेदनाच्या प्रति संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत.