नांदेड – येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चव्वेचाळीसाव्या काव्य पौर्णिमेचे आयोजन शहरातील नमस्कार चौक परिसरातील गुरु कर्मवीर नगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात २३ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे. या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाला ज्येष्ठ कवींसह अनेक नवोदित कवी सहभागी होणार असून श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथील भिक्खू संघाचीही उपस्थिती राहणार असल्याची माहिती काव्य पौर्णिमा कार्यक्रमाचे निमंत्रक निवृत्ती लोणे यांनी दिली.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दर पौर्णिमेला काव्य पौर्णिमा या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. काव्य पौर्णिमा या मालेतील ही चव्वेचाळीसावी काव्य पौर्णिमा असून नमस्कार चौक ते सामाजिक न्याय भवन रस्त्यावरील गुरु कर्मवीर नगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात २३ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला भदंत पंय्याबोधी थेरो आणि भिक्खू संघासह अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, गोविंद बामणे, विठ्ठलकाका जोंधळे, निवृत्ती लोणे, आ.ग. ढवळे, थोरात बंधू, शरदचंद्र हयातनगरकर, उषाताई ठाकूर, बालिका बरगळ, राजेश गायकवाड, भैय्यासाहेब गोडबोले, महेंद्र भगत आदी कवी कवयित्री सहभागी होणार आहेत.
दरम्यान, वर्षावास पौर्णिमेनिमित्त भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गुरु कर्मवीर नगरच्या सम्राट अशोक मित्र मंडळासह भारतबाई इंगोले, स्वर्णमाला नरवाडे, सरस्वती सोनाळे, इंदूबाई दुधाडे, पार्वती वाघमारे, गयाबाई दुधमल, पुष्पा वाठोरे, कमल वाठोरे, इंदूबाई रणवीर, लक्ष्मी घोडगे, सत्यभामा पाटील, उषा लोणे, सरस्वती वाठोरे, त्रिशला घोडगे, बेबीताई सोनाळे, संगिता नरवाडे, सुषमा राठोड, मंजुळा वाठोरे, नेहा पाईकराव, उज्वला वाठोरे, मंजुळा पाईकराव आदींनी केले आहे.