पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंती निमित्त कंधार येथे शेतकरी दिन साजरा


आज दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात आला हा कार्यक्रम पंचायत समिती कंधार येथे गटविकास अधिकारी कंधार ,तालुका कृषी अधिकारी कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयातही शेतकरी दिन साजरा करण्यात आला.


कंधार येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती कंधारचे सदस्य उत्तम चव्हाण होते. या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याची माहिती दिली

कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी तथा विठ्ठलराव विखे पाटील परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा गायकवाड यांनी आपले विचार मांडले. मंडळ कृषी अधिकारी रमाकांत भुरे यांनी आपले विचार मांडले.

अध्यक्षीय भाषणात पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी शेतकरी दिनाच्या निमित्ताने विठ्ठलराव विखे पाटील यांचा कार्याचा गौरव केला. समारोप पंचायत समिती कंधारचे कृषी अधिकारी शिवराम मुंढे यांनी केला.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याची माहिती

आशिया खंडातील कृषीवर आधारित उद्योग पहिला साखर कारखाना त्यांनी उभारला सहकार क्षेत्रासह विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य उपक्रमात त्यांच्या कर्तुत्वाचा मोठा वाटा होता.

सन २०१४ पासून राज्यात त्यांची जयंती शेतकरी दिन म्हणून साजरी करण्यात येते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे राज्यातील कृषी औद्योगिक व सहकारी साखर कारखानदारांचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात.

शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेल्या विठ्ठलरावांनी सन १९४३ साली स्वतः यंत्र आणून खांडसरी सुरू केली. सन १९४८ मध्ये त्यांनी दी बागायतदार को-ऑपरेटिव्ह या पहिल्या सहकारी तत्त्वावरील साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवली कारखाना स्थापन झाल्यावर १५ मे १९६१ रोजी ११ वर्षानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते कारखान्याचे उद्घाटन केले.

सुरुवातीला प्रा. धनंजयराव गाडगीळ हे अध्यक्ष होते.१९६० ते ६४ या काळात डॉ.विठ्ठलराव विखे पाटील हे अध्यक्ष होते. १९५० मध्ये महात्मा गांधी विद्यालयाची तर १९५९ मध्ये मुलींसाठी प्रवरा कन्या विद्यामंदिर याची त्यांनी स्थापना केली १९७६ मध्ये शासनाच्या कुटुंबनियोजन कार्यामध्ये त्यांनी पुढाकार घेत जनजागृती केली व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *