वडील प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ येथे पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त.लहानपणापासून सामाजिक चळवळीत अग्रेसर.सुरवातीपासून आर्थिक परिस्थिती बेताची.म्हणून संघपाल यांनी परिसरातील गाववाडी मोहल्ला असो सर्व जातीधर्माच्या घोळक्यात तरुण चेहरा.
कंधार शहरासह बारुळ परिसरात पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील एक नवीन हिरा म्हणजे पत्रकार संघपाल, नवोदितांचे मार्गदर्शक,निर्भीड आणि यांची लेखणी नेहमीच अनेक तरुण,राजकीयपुढारी,येड्या गबाळयाची पाठराखण तर परिसरातील शेतकरी, अडल्या नडल्याल्याचा धनी.अन आपल्या भागात घडलं बिघडलं त्यात ही सहभाग घेऊन समजेस पणा अन विधायक कामाची वार्ता दैनिकात मांडणारा संघपाल. त्यांचा आज वाढदिवस …
खरं तर समाजाचं प्रतिबिंबित्व उमटवण्यात जाते, वृत्तपत्रात काम करताना अनेकांचे वाढदिवस साजरे करताना ज्यांच्या लेखणीतून व्यक्तिमत्व रेखाटली जातात , त्या पत्रकाराचा वाढदिवस किंवा त्याच्या बद्दल समाजात आजही फारस कोणी बोलत नाही. पण समाजाच्या मनात कायम घर करून राहणाऱ्या खऱ्या पत्रकाराचे अढळ स्थान मात्र कुणी कधीच हिराऊ शकत नाही हे देखील सत्य आहे.मी संघपाल यांना गेली अनेक वर्षांपासून ओळखतो.गावात समश्यांनभूमी असो व आरोग्य विषयक जनजागृती,पाण्याचा प्रश्न असे अनेक विधायक अन लहाण्या पासून ते वृद्ध माणसासाठी केलेलीली मदत. परिसरात त्यांची दांडगी ओळख.गटविकास अधिकारी राहाटीकर, तशिलदार वेंकटेश मुंडे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्याकडे जाऊन बारुळ गावातील समश्यांन भूमीचा कायम प्रश्न मिटवला.गाव अन समाजासाठी काही चांगलं काम करतोय, ह्यामुळे त्यांची जवळकी झाली अन मित्रत्व वाढत गेलं.
पत्रकारिता ही एक अशी प्रणाली आहे की यात काम करणाऱ्या माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन व ज्ञानदान संपत नाही.खरेतर संघपाल यांची सुरुवात हल्ली उशिरा झाली. यांच्या पत्रकारितेला आत्ता उभारी मिळते आहे. नव्या विषयाचा अभ्यासुपणा,शिक्षण,सामाजिक बांधिलकी,प्रशासन , राजकारण इतकेच नव्हे तर
गावातील गोरगरिबांची तालुक्या वरील कामे करण्याची मनापासून आवड.
वयाच्या अगदी कमी वर्षांपासून सामाजिक बांधिलकी पत्रकारितेच्या झनझावतात या माणसाने लेखणीला मोठी धार आणली. दुष्काळाची दाहकता , प्रशासनातील अधिकाऱ्यांवरचे आसूड असोत अथवा राजकारण्यांची केलेली चिरफाड असो वा विविध विषयावरचे लेखन हे नेहमीच चर्चेचे विषय ठरले आहेत.यापुढे जाऊन सांगायचे तर ग्रामीण भागात पत्रकारिता करणारा हा माणूस नेहमीच निकोप आणि दर्जेदार लिखाण करीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अशा वेगळ्या विषयाच्या संकल्पना लिहिणारा व रुजवणारा हा पत्रकार !
यांच्या व्यक्तिमत्ववात अनेक वैशिष्ट्य दडलेली आहेत .निसर्गावर अपार प्रेम करणारा आणि निसर्गप्रेमी हा पत्रकार आहे . माती, दगड, गोटे, अनेक गावातील पाणी चळवळ, वेतन,दुष्काळ यावर संवेदना बाळगणारा हा माणूस. ग्रामीण पत्रकार यांच्या उन्नतीसाठी नवे विषय समोर ठेवणे, गरीब, दुःखी,बेरोजगारांना मदत करणे, दवाखान्यात दाखल करणे असो की गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजातील मुलांचे शिक्षण असो असे अनेक उपक्रमात सहभाग.
अनेक विषयाचे शासन दरबारी रखडलेले प्रश्न व ग्रामीण भागातील जनतेच्या समश्यां, गोरगरिबांवर होणारे अन्याय व होत असली कुचंबणा, हेडसांड आपल्या परखड लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न केला.सामाजिक व पत्रकारितेतील लोक नेता म्हणून परिसरात ओळख निर्माण केली.
वास्तविक पत्रकार हा आगोदर एक माणूस आहे , त्याच्या सुख-दुःखात एकीचे बळ एकवटले पाहिजे. तशी भावना सगळ्यांमध्ये रुजायला हवी, कारण ती काळाची गरज आहे.
संघपाल वाघमारे (बारुळकर) प्राथमिक शिक्षक यांना वाढदिवसानिमित्त खुप सार्या शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य,लाभो याच मनस्वी सदिच्छा…!मुरलीधर थोटे,कंधार संवाद: 9890274412