चिंब कवितेने मनं झाली आबादानी.


अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर जयंती निमित्त अहमदपूर येथील समतावादी सांस्कृतिक साहित्य परिषदेच्या वतीने मंगळवार ,दि १७ आँगस्ट २१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता, मोघा येथे विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेलनात १४ कवी सहभागी झाले होते.या कविसंमेलनाचे अध्यक्ष विलास सिंदगीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ मारोती कसाब हे होते. प्रतिथयश कवी तथा माजी प्राचार्य तुकाराम हारगीले सर यांनी या सुंदर आणि नेटक्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. कविसंमेलनाचे अध्यक्ष विलास सिंदगीकर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आयोजक प्राचार्य तुकाराम हारगीले सरांतर्फे फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
मेघना नदीच्या काठी, विद्रोहाचे पितामह संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोरच्या उघडया सभाग्रहात हे कविसंमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पावसाची संततधार चालूच होती. त्यामुळे गीतकार ना.धो. महानोर सरांची माफी मागून आणि त्यांच्या शब्दात थोडा बदल करून म्हणावे वाटते, ” चिंब कवितेने मनं झाली आबादानी.”त्या समतावादी विद्रोही कविसंमेलनाविषयी….


सुरुवातीला शाहीर – कवी अंकुश सिंदगीकर यांनी आपल्या पहाडी आवाजात मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील पहिला शहिद , विर पोचिराम कांबळे यांची सबंध जीवनगाथा, आयुष्याचा पट जमलेल्या श्रोत्यांना ऐकवला. आणि श्रोत्यांच्या अंगावर शहारे उभे केले. दि ०४ आँगस्ट हा शहिद विर पोचिराम कांबळे यांचा स्मृती दिवस आहे.


अण्णा भाऊची वाणी
मानवतेची गाणी.
समतेची पेरणी
ही तुझी लेखणी.


ही गेय कविता सादर करून प्रा डॉ सतिष नाईकवाडे यांनी कार्यक्रमात एक वेगळी रंगत भरली. तर कविसंमेलनाचे बहारदार सुत्रसंचालन करणारे, प्रत्येक कवितेचा संदर्भ उलगडून सांगत, प्रत्येक कवी आणि कवितेसाठी कवितेचे एक सुसंगत चरण सादर करून कार्यक्रमाचा एक दुवा बनलेले प्रा डॉ व्यंकट सुर्यवंशी यांनी ,” तुका ” या नावाची स्वरचित विद्रोही कविता सादर केली. ती असी..


तुकाराम भाऊराव साठे
ते अण्णा भाऊ साठे
४९ वर्षाचा प्रवास,
मानवी जीवनात
अशक्य काहीच नाही.
हे सिध्द करणारा…..
अत्त दिप भवं चा प्रवास !


दोन प्रकाशित कविता संग्रहाचे धनी प्रा डॉ सुशिलप्रकाश चिमोरे यांनी, कोणत्याही कार्यक्रमाचे अवश्य आँडीट व्हावे. त्या कार्यक्रमाचे आऊट पुट निघावं. पण बहुजन समाज नेमकं हेच काम करत नाही. हे सांगून आपण वाचलं पाहिजे असा उपस्थित श्रोत्यांना सल्ला दिला. आपण एम ए बि एड आहोत. पण कारखाने कुणाच्या मालकीचे आहेत. ? हा अंतर्मुख करणारा प्रश्न उपस्थित करून विठ्ठल कामत यांचे उदाहरण दिले. शिवाय प्रबोधन व्हावे ही रास्त अपेक्षा व्यक्त करून, ” अमर अण्णा भाऊ साठे ” ही रचना सादर केली. ती पुढीलप्रमाणे,
विज्ञानाची वाट तू
विद्रोहाची पहाट तू.
वेदनेची गाणी
अण्णा भाऊची वाणी.


समतावादी विद्रोही कविसंमेलनाचे प्रमुख पाहुणे तथा समीक्षक प्रा डॉ मारोती कसाब यांनी विद्रोहाचे पितामह, महाराष्ट्र भुषण, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. ती असी..
तुका तुझी गाथा
बुडविली कोणी ?
खरी खरी कथा
सांग मला.


जेष्ठ साहित्यीक तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एन डी राठोड यांनी अण्णा भाऊ साठे यांनी ,”फकिरा ” ही कादंबरी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास अर्पण केली आहे. तर ,” अग्नी दिव्य ” ही कादंबरी हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना, त्यांच्या कार्यास अर्पण केली आहे. हे सांगून अण्णा भाऊ साठे यांचा गौरव करणारी एक कविता सादर केली.


तर नवतरुण आणि नवोदित कवी विजय पवार यांनी पण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित, ” हिरा जन्मला ” ही रचना सादर केली. ती पुढीलप्रमाणे..


हिरा जन्मला, उद्धार झाला
महाराष्ट्र राज्याला, भारत मातेला.
साहित्यिक आला, साहित्यरत्न झाला.
याचा गर्व आम्हाला, हिरा जन्मला.


सबंध मराठवाडाभर कुठे २० – २२ दिवस तर कुठे २० – २५ दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यावर उपाय म्हणून, पावसाला येण्याची विनंती कवी प्रा भगवान आमलापुरे यांनी आपल्या, ” वसंत ” या कवितेतून केली. शिवाय पाऊस वेळेवर येत नाही म्हणून आपल्या कवितेतून एक प्रश्न पावसास विचारला आहे. तो असा…
खरं सांग पावसा
तू स्वतःच थकला,
की हा कामचुकारपणा
आम्हा मानवाकडून शिकला ?

      सत्काराला उत्तर आणि अध्यक्षीय भाषणात विलास सिंदगीकर ,सदस्य : साहित्य सांस्कृतिक मंडळ ,महाराष्ट्र म्हणाले की
    जग बदल घालूनी घाव
     सांगुनि गेले मज भिमराव.

साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या ओळीचा उल्लेख करून, त्याचा सार जमलेल्या गावकऱ्यांना समजून सांगितला. वाचन करावे, जमेल तसे लिहते व्हावे असे सांगून, सगळीकडे माझा सत्कार केला आहे. पण समाज बांधवांनी केलेला हा पहिलाच सत्कार आहे. असे पण त्यांनी अवार्जून सांगितले. प्राचार्य तुकाराम हारगीले सरांच्या, फकिरा ” या कवितेने कविसंमेलनाचा समारोप झाला.


प्रा भगवान आमलापुरे
फुलवळ : ९६८९०३१३२८
शं गु महाविद्यालय धर्मापुरी.
ता परळी वै.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *