किनगांव -मौजे देवकरा ता. अहमदपूर जि. लातूर येथील सुपुत्र प्रा. डॉ.रामकृष्ण दत्तात्रय बदने यांना नुकताच शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा उत्कृष्ट प्राध्यापक (ग्रामीण) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या घटनेचे औचित्य साधून देवकरा ग्रामस्थांच्या वतीने प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांचा सत्कार समारंभ ब्रह्मीभूत संत मोतीराम महाराज पुण्यतिथी सोहळा प्रसंगी याच गावचे सुपुत्र माजी जि. प. सदस्य तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते त्र्यंबक आबा गुट्टे, डॉ. रामदास गुट्टे,ग्राम पंचायत सदस्य भगवानराव बदने, श्रीधर विनायकराव फड, संवादतज्ञ उद्धव फड,प्रा.बाबासाहेब फड, नरहरी फड,विश्वंभर मुरकुटे,व्यंकट बदने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन प्रोफेसर, प्राचार्य या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांना यापूर्वी २९ पुरस्कार प्राप्त आहेत. महाविद्यालयात शिक्षण देत असतानाच उर्वरित वेळेत त्यांनी लोक शिक्षकाची भूमिकाही पार पाडतात.व्याख्यान, कीर्तन,प्रवचन, विविध विषयावरचे लेखन या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. संशोधनातही त्यांचे मोठे योगदान आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने चार जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करणारे प्राध्यापक म्हणून त्यांना वरी पुरस्कार घोषित केला आहे.
माझ्या जन्मभूमीत झालेला हा पहिला सत्कार असून ग्रामस्थांचे प्रेम बघुन मी धन्य झालो. गावकऱ्यांच्या प्रेमाला मी कधीच पारखा होणार नाही अशा संवेदना सत्कारमूर्ती प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी यावेळी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. योगीराज बदने यांनी केले तर आभार संवादतज्ञ उध्दव फड यांनी मानले.
कार्यक्रमास माजी पोलिस निरीक्षक विनायकराव फड, किशोरजी फड, सेवानिवृत्त अभियंता जनार्दन मुरकुटे,शिवाजीराव गुट्टे,चांगदेव फड, त्र्यंबकराव फड, वामनराव गुट्टे,सरपंच व्यंकट सूरवसे,माजी सरपंच पारनाथ गुट्टे, बालाजी गुट्टे,माधव मुरकुटे, भागवत बदने,विश्वंभर गुट्टे,गणेश फड,ग्रामस्थ, आप्तेष्ट,मित्रपरिवार व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.