नांदेड दि.2 काँग्रेस पक्ष हाच तळागाळातील जनसामान्यांचे हित जोपासणारा पक्ष असून माझ्यासारखा रस्त्यावरील सर्वसामान्य कार्यकर्त्यास एवढी मोठी संधी देऊन ना.अशोकराव चव्हाण यांनी माझ्या कार्याला न्याय दिला असून यातूनच सामान्यांना न्याय काँग्रेसमध्येच मिळतो हा संदेश असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी काल (दि.27) प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यात मुखेड चे उपक्रमशील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस चे तालुकासरचिटणीस डॉ.श्रावण गोविंदराव रॅपनवाड यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सचिवपदी निवड झाली आहे. त्यानंतर नरसी येथे तालुकाध्यक्ष संभाजी भिलवंडे यांनी त्यांचा सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते.वडार समाजाचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी असणाऱ्या डॉ. रॅपनवाड यांची निवड ना. अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीने प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. याबद्दल त्यांनी ना. चव्हाण, नाना पटोले, प्रा. भानुदास माळी, मा.आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे आभार मानले.
डॉ. श्रावण रॅपनवाड म्हणाले की माझ्यासारख्या सर्वसामान्य अत्यल्प समाजात जन्मून रस्त्यावर कार्य करणाऱ्या प्रामाणिक कार्यर्त्यांच्या कामाचीही दखल घेऊन मोठी संधी काँग्रेसमध्येच मिळते हे सिद्ध झाल्याचे सांगतानाच निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री ना.अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, आ. अमरभाऊ राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, माजीमंत्री डी.पी. सावंत, मा.आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, ज्येष्ठ नेते शेषराव चव्हाण, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मंडलापूरकर, शहराध्यक्ष नंदुकुमार मडगुलवार, तालुकाध्यक्ष संभाजी भिलवंडे आदींनी अभिनंदन केल्याचे सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी जेष्ठ सहकारी बहुजननेते डाॅ.श्रवण -यापनवाड यांची निवड झाल्या बद्दल आज नरसी येथे त्यांचा सहृदय् सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, तालुका काँग्रेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अनिल कांबळे,पिराजी मेटकर,गोविंदराव पवार,खंडोजी देवकर,नागेश मेटकर, पिराजी पवार,राजू आळंदे,बालाजी मेटकर,साहेबराव मेटकर, सूर्यकांत आळंदे, पिराजी -यापनवाड,बाजी मेटकर,गोविंद मेटकर, संजय -यापनवाड,आदी उपस्थित होते.