कंधार ;प्रतिनिधी
कंधार तालुक्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसामुळे कहर केला असून तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले असून अतिवृष्टी मुळे परिसर जलमय होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.आसुन पंचनामा न करता सरसगट शेतकऱ्यांना अतिवृष्टी व दुष्काळ जाहीर करा अशी मागणी नांदेड ,मार्ग पांगरा, बहादरपुरा ,मार्ग फुलवळ मुखेड कडे त्यांचा ताफा जात असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री मा, ना, अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे कंधार ऑल इंडिया तंजीमे इन्साफ च्या वतीने मागणी करण्यात आली .
त्याच वेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे माजी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संजय ईश्वरराव भोसीकर गावचे सरपंच प्रतिनिधी नागनाथराव मंगनाळे माजी सरपंच बालाजी देव कांबळे , गावातील जेष्ठ नागरिक विश्वंभर मामा फुलवळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थिती होते.
तालुक्यामध्ये नदी नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला अनेक फुलांचे व रस्त्यांची दुरावस्था झाली असून ज्या गावांमध्ये फुलांची उंची कमी आहे त्या त्या गावांमध्ये फुलाची उंची वाढवून तात्काळ मंजूर करण्यात यावी,
कंधार तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेला आहे.त्यासाठी अधिकाऱ्यांना पंचनामा न करण्याचा आदेश देऊन शासनाने सरसकट अतिवृष्टी व दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावं अशी मागणी ऑल इंडिया तंजीमे इन्साफच्या तालुका अध्यक्ष शेख शादुल भाई यांनी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.