शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या – संजय भोसीकर यांची मागणी

प्रतिनिधी, कंधार

तालुक्यातील ७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुका प्रशासनाने अतिवृष्टीग्रस्त नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी.जि.प.सदस्य तथा जिल्हा काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केली आहे.
तालुक्यात मंगळवारी ७ सप्टेंबरला ७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतजमीन खरडून गेली आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच रस्ते, पूल, घरे व वीजेच्या खांबाची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. त्यामुळे माजी.जि.प.सदस्य तथा जिल्हा काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी फुलवळ, कंधारेवाडी, पानशेवडी व बहदरपुरा आदी गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तालुका प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी केली.


यावेळी मंडळ अधिकारी शिवदास पटणे, नागेश सादलापुरे, कृष्णाभाऊ भोसीकर, भोजुचीवाडीचे सरपंच प्रतिनिधी सतिश देवकत्ते, कंधारेवाडीचे सरपंच प्रकाश डिगोळे, पानशेवडीचे उपसरपंच कोंडीबा मोरे, गंगाधर शेलगावे, बहादरपुरच्या सरपंच सौ.गोदावरीबाई गायकवाड, उपसरपंच हणमंतराव पाटील पेठकर, ग्रामपंचायत सदस्य बालाजी तोटावाड, विजय गायकवाड, देवराव कदम आदींसह शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *