कंधार / प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील गऊळ येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा प्रकरणी प्रशासनाकडून दिलेले आश्वासन पुर्ण न झाल्याने व आरोपींवर गुन्हे दाखल न झाल्याने कंधार तालुका सकल मातंग समाज अस्वस्थ झाला असून आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत व प्रशासनाकडून अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा सन्मानपूर्वक त्याच जागेवर बसविण्यात यावा यासाठी दि.१५ सप्टेबंर रोजी सकाळी ११ वाजता साठे नगर ते तहसील कार्यालय कंधार धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
३१ ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील मौजे गऊळ येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या औचित्यावर ग्रामपंचायतच्या अभिलेखातील नमुना नंबर ८ अ वरील नियोजित जागेवर ग्रामस्थांच्या वतिने पुतळ्याच्या सरंक्षणाची हमी देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्या समक्ष पुतळ्याच्या जागेचा असलेला वाद मिटवून ग्रामस्थांनी पुतळा बसविला.याबाबतचे शपथपत्र दोन्ही समाजाच्या स्वाक्षरीनिशी नियोजित जागेतील २० फुट जागा सोडून पुतळा बसविण्यात आला होता. त्यावेळी सर्व वाद संपुष्टात आल्याचे साठे म्हणाले.
परंतु २ सप्टेंबर रोजी नांदेड येथून पोलिस प्रशासन गऊळ येथे येऊन मोठा फौजफाट्या सह हजर झाले. सदरील पुतळा हटविण्याचा प्रयत्न करत असतांना,ग्रामस्थांकडून विनंती करण्यात आली.परंतु दगडफेकीच्या नावाखाली समस्त मातंग समाजावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेत २० ते २५ मातंग समाजातील महिला व पुरूष जखमी झाले. ग्रामसेवकाला हाती धरून शासकीय कामात अडथळा प्रकरणी सुमारे ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.या प्रकरणी समाजातील काही लोकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठराव घेऊन १७ सप्टेंबरपुर्वी मागण्यांना न्याय नाही मिळाल्यास मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी नांदेड येथील अण्णाभाऊसाठे पुतळ्यापासुन लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून जाब विचारणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन देण्यात आला होता.यानंतर प्रशासनाने सहा दिवसांत पुतळा बसविण्याचे आश्वासन दिले.परंतू प्रत्यक्षात पुतळा बसविण्यात आला नाही.त्यामुळे संतप्त मातंग समाजाने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
अशी आहे मागणी…