‘यह आझादी झुटी है,देश की जनता भूखी है..!१६ ऑगस्ट १९४७

१६ ऑगस्ट १९४७

“यह आझादी झुटी है,देश की जनता भूखी है। ” 

थोर स्वातंत्र्य सेनानी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे म्हणतात…

” स्वातंत्र्य आणि सत्ता हस्तांतरण यातील नेमका फरक तो काय ? हे जो पर्यंत समजणार नाही तो पर्यंत खरे स्वातंत्र्य भारतीयांना कळणार नाही.”

म्हणूनच अण्णा भाऊ साठे यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी ” यह आझादी झुटी है,देश की जनता भूखी है।” या आंतरराष्ट्रीय संदेशपर घोषणेने दणाणून सोडलेला महामोर्चा हा येथील शोषित,पिडीत,वंचित,उपेक्षीत,गरीब,श्रीमंत,भांडवलदार प्रस्तापित व सत्ताधिशांसह आदींना सत्ता हस्तांतरणातील उणीवांच्या जाणीवेसाठी काढला होता.

तर…वंदनिय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीसिंह नाना पाटील,थोर स्वातंत्र्य सेनानी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे,लोकशाहीर अमर शेख आदींच्या सहवासात राहुन त्यांची विचार प्रेरणा घेऊन समाज प्रबोधनासाठी डफावर थाप मारत क्रांतीकारी आंबेडकरी शाहीरीतून समाज मन पेटविण्याचे ज्यानी महान कार्य केले. तसेच भारत स्वातंत्र्य,संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.परंतू सरकार तर्फे स्वातंत्र्य सैनिकास दिल्या जाणा-या सोयी सुविधा,मानधन आदी बाबींचा स्विकार अण्णा भाऊ साठे यांनी केला नाही म्हणून आपण ही ते स्विकारणार नाही! अशी  ठाम भूमीका बजावणारे तथा राजकिय क्षेत्रातही दबदबा निर्माण करत भल्याभल्यांना सळो की पळो करणारे एक प्रेरणादायी आदर्श व्यक्तीमत्व व आंबेडकरी शाहीरीबाण्यातील स्वातंत्र्ययोद्धा नागसेन शिवलिंग विभुते उर्फ शाहीर जंगम स्वामी यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या ” यह आझादी झुटी है,देश की जनता भूखी है। ” विषयी मला सांगतीलं की… 


भारतीय स्वातंत्र्य,स्वातंत्र्य चळवळ व त्यातून मिळणारे खरे स्वातंत्र्य नेमके कोणासाठी ? या विषयी व्यापक दुरदृष्टी असलेले व्यक्तीमत्व अर्थातच सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे होत.अण्णा भाऊ साठे हे केवळ मराठीतलेच शाहीर नव्हते तर हिंदीतले ही उत्तम ‘शायर’ होते.कर्तव्यभूमी मुंबईत त्यांचा अगदी बालपणी विविध कामे करतांना बंगाली,पंजाबी,बिहारी,गुजराती,उत्तर प्रदेशी,हिंदी भाषीकांशी त्यांचा संपर्क आला.यामुळे मराठी ऐवजी इतर भाषा ही त्यांना चांगली समजत होती.ते हिंदीत ही लिहायचे.लोकशाहीर अमर शेख यांच्याशी उत्तम हिंदीत बोलतांना मी त्यांना पाहिलं.१६ ऑगस्ट १९४७ रोजी काढलेल्या महामोर्चाचे जे घोषवाक्य होते  ” यह आझादी झुटी है,देश की जनता भूखी है।” हे अण्णा भाऊ साठे यांच्या हिंदी भाषेतील अजरामर कवनातं एक महत्वपुर्ण वाक्य आहे आणि ते कवन पुढील प्रमाणे आहे.


इस देश के इन्कलाब बेहिसाब बेलगाम थेइस देश में हम गुलामों के भी गुलाम थेउस आझादी के जंग ए राह पर हम भी तो थे…
गोरे अंग्रेज तो गए है,लेकीन…काले अंग्रेज अभी भी बाकी हैयह आझादी झुटी है,देश की जनता भूखी है। 

यातून खरच अण्णा भाऊ साठे हे किती व्यापक दुरदृष्ठे होते हे दिसून येते.त्यांनी मांग,महार,चांभार किंवा फक्त महाराष्ट्रातलेच लोक ‘भूखे है’ म्हटलं नाही तर संबंध भारतातील गुलामांचे गुलाम अर्थातच ब्रिटिशांची सत्ता असतांना त्यांचे गुलाम असलेले भांडवलदार प्रस्तापित अशा दोघांचे ही आणि सत्ता हस्तांतरणा नंतर म्हणजेच स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांचे गुलाम असलेल्या भांडवलदार प्रस्तापितांचे गुलाम असलेली जनता भविष्यातही त्यांची गुलामच राहणार आहे ? त्यांना स्वातंत्र्य मिळणारच नाही ? हे अण्णा भाऊ साठे जाणून होते.म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्या विरोधात नाही तर सत्ता हस्तांतरणातील उणीवांची जाणीव करुन देऊन,खरे स्वातंत्र्य कधी मिळणार ? याचा जाब विचारण्याठी हा महामोर्चा काढला होता.ब्रिटिशांकडून भारतीयांकडे सत्ता हस्तांतर झाली.लोकशाही स्थापित झाली.परंतू आज ही येथील गुलामांचे गुलाम अर्थातच शोषित,पिडीत,वंचित,उपेक्षीत,अस्पर्ष,मागासवर्गीय,गरीब आदींना पुर्णत: स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे ? हे निदर्शनास येत नाही.


वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर व म.गांधी यांच्यात स्वातंत्र्या विषयी झालेला संवाद बरेच काही सांगून जातो…” मि.गांधी..स्वातंत्र्यावर तुम्ही फार गप्पा मारता आणि येथील व्यवस्थेने तर आम्हाला गुलामांचे ही गुलाम बनऊन ठेवलं आहे.यावर म.गांधी म्हणतात…डॉ.आंबेडकर,अहो आम्ही इंग्रजांचे गुलाम आहोत आणि यातून अगोदर मुक्त होऊ द्या.नंतर तुमचा विचार करीन.यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात….मि.गांधी..तुम्ही इंग्रजांचे गुलाम व आम्ही गुलामांचे गुलाम.म्हणजेच आम्ही दुहेरी गुलाम.या गुलामीतून मानवमुक्ती आवश्यक आहे.” एकूणच अण्णा भाऊ साठे यांनी काढलेला हा महामोर्चा वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रेरणेतील साम्यता ही सांगून जातो.
वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला पवित्र राज्य घटना दिली.त्यातून लोकशाही मुल्यांसह सर्व हक्क दिलेत.परंतू त्यांनी म्हटलं होतं…ही राज्य घटना अर्थातच भारताचे संविधान हे जगात श्रेष्ठ आहे.परंतू सत्तेत आलेल्या राज्य कर्त्यांवर अवलंबून आहे की योग्य रित्या राबवून ती उत्तम कसे ठरविणार ? वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या दुरदृष्ठीतला भारत आजही पहावयास मिळत नाही. गुलामांच्या गुलामांना अद्यापही खरे स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही.ही खेदाची व आत्मपरिक्षणाची बाब आहे.

स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य व मानवमुक्तीसाठी अमुल्य योगदान देणा-या थोर स्वातंत्र्य सेनानी साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना ” भारतरत्न पुरस्काराने ” सन्मानित करण्यात यावे,अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘आर्टी ‘ ची स्थापना करण्यात यावी.यासह समाजोन्नतीसाठी आदी मागण्या कराव्ृा लागत आहेत.यासाठी समाज बांधव,सामाजिक संघटना,नेते, अण्णा भाऊ साठे विचार अनुयायी व साहित्यप्रेमींसह आदींनी मागण्या लाऊन धरल्या आहेत.तसेच राज्यातील विधानसभा अध्यक्ष,आजी माजी नामदार,खासदार,आमदार,लोकप्रतिनिधी अशा अनेकांनी ही याबाबद राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी व आदी संबंधीतांना शिफारसपत्र लिहले आहेत.विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.याच अनुशंगाने १ ऑगस्ट २०२० पुर्वी राज्य व केंद्र शासन उपरोक्त मागणी पुर्ण करेल ? अशी अपेक्षा होती.स्वातंत्र्य दिन उजाडला,परंतू पुर्वसंध्ये पर्यंतही याकडे कोणीही लक्ष दिले नाही.अपेक्षा भंग झाली.लोकशाहीत लोकांनी निवडूण दिलेले लोकप्रतिनी हे सेवक नाही तर सत्ताधिश मालक समजून असे वागत असतील तर आपल्या मागण्या कोणा समोर मांडाव्यात ? हा प्रश्न समोर येतो.


भारताचे पवित्र व सर्वोच्च मानके कोणती ? तर पवित्र संविधान आणि तिरंगा ध्वज ! यांपुढे झुकलं पाहिजे,नतमस्तक झालं पाहिजे,विनम्रपणे मागण्या व आपले म्हणने मांडलेच पाहिजे.मग ते ‘मुक’ आंदोलनातूनच का असेना.गेल्या ४ वर्षापुर्वी ही माझ्या नेतृत्वात १६ ऑगस्ट रोजी ” यह आझादी झुटी है,देश की जनता भूखी है।” म्हणत मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन भोकर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यकर्ते सत्ताधिशांना दिलो होतोत.तर याच अनुशंगाने स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२० रोजी मी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा आंतराष्ट्रीय दुरदृष्टीकोणातला ” यह आझादी झुटी है,देश की जनता भूखी है। ” हा अजरामर संदेश व उपेक्षीतांच्या या नायकास ” भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा !” असे लिहलेला त्यागाचे प्रतिक असलेल्या लाल रंगाचा पोशाख परिधान केला व भोकर नगर परिषद,तहसिल आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जाऊन पवित्र तिरंगा ध्वजाज सलामी दिली,सॅल्युट केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच्या नियमांचे पालन करुन कसलेही निवेदन दिले नाही,कसल्याही घोषणा दिल्या नाहीत.परंतू जो ” मूक ” संदेश द्यायचा होता,जी मागणी मागत आहोत ती मात्र पवित्र तिरंगा ध्वजापुढे मांडलो आहे.यावेळी ज्यांना जो संदेश घ्यायचा होता त्यांनी तो घेतला.परंतू खेदाची अशीही एक बाब माझ्या निदर्शनास आली की,ऐरवी अण्णा भाऊ साठे यांचे अनुयायी व प्रेमी आहोत म्हणून घेणारे तेथे उपस्थित असलेले काहीजण मात्र माझ्या जवळ येण्यास व बोलण्यास टाळत होते.काही जण टिंगल टवाळी करत मिश्कीलपणे हसून मला वेड्यात ही काढत होते.नव्हे तर त्यां सर्वांनी माझ्या जवळून दूर राहणेच पसंत केल्याचं निदर्शनास आलं.


असो… ?आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे व मी ते पार पाडलं…!यात मला खुप समाधान मिळालं.या मुक संदेशा विषयी अनेकांनी कौतुक ही केलं व काही धाडसी विचार अनुयायी जवळ आले ही.त्या सर्वांसह पोलीस व प्रशासनाचा आणि सर्वांचाच मी अगदी मनापासून आभारी आहे.खुप खुप धन्यवाद !तसेच उपरोक्त मागण्या लवकरच पुर्ण होतील ? अशी अपेक्षा ठेऊन मानसिकदृष्ट्या स्वतंत्र होणे हाच स्वातंत्र्यदिनाचा संकल्प असावा ! असा समज ठेऊन थांबतो !जय लहुजी ! जय भिम !! जय अण्णा !!!” यह आझादी झुटी है,देश की जनता भूखी है। “

उत्तम बाबळे,संपादकसाहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषणअध्यक्ष – भोकर तालुका मराठी पत्रकार संघप्रदेशाध्यक्ष – अण्णा भाऊ साठे क्रांती आदोलन,महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *