आनुभवाचे बोल ; माणुसकी जपणारे डॉक्टर : डॉ.गोपाल चव्हाण


चार सप्टेंबर रात्री दहा वाजेपर्यंत गप्पा मारल्या . टिव्हीच्या बातम्या ऐकल्या सकाळी उठून फिरून आल्यानंतर शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सर्व शिक्षक बांधवाना देवू असं ठरवत ठरवत नंतर झोप कधी लागली हेही कळाले नाही . दुसऱ्या सकाळी माझ्या समोर काय संकट येणार होतं याची थोडीही चाहूल लागली नाही . नियमितपणाच्या सरावाप्रमाणे पहाटे चार वाजता उठलो . शरीराला आळोखो पिळोखे देत थोडं वेळ तसाच पलंगावर पडून राहिलो . चार पंचवीसला उठलो . तिन ग्लास पाणी प्यालो . थोडा वेळ पलंगावर बसून राहीलो . साडे चार वाजता गेटमधून बाहेर पडलो . त्यावेळीही शरीराने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही . माझा भाचा लक्ष्मण जाधव गुरुजी माझ्या सोबत तसेच ख्रोब्राजी माडगे गुरुजीही होते .

          नियमितपणे जातो त्याच मार्गाने झपाझप पावले टाकीत गप्पा करत तिघही चालत होतो . घरापासून आडीच तिन किमी चालल्यानंतर माझ्या छातीच्या उजव्या बाजूला खाली लागून दोन बरगड्याच्या मध्ये थोडीशी वेदना जाणवली . मी त्याकडे साफ दुर्लक्ष करून चालत होतो ; पण वेदना हळूहळू वाढू लागाली . पुढे इतकी वाढली की चालताना बोलताना व श्वास घेताना खूपच त्रास होवू लागला . मी दोघांही गुरूजींना  सांगितलं , " गुरु मला खूप तकलीफ होत आहे . खूप त्रास होतोय . " मी बोलताना ते थोडंसं कावरेबावरे झाले . काय झालं ? काय होतय ? छातीत दुखते काय ? दम घेताना त्रास होतो का? घाम आलय का? जाधव माझा भाच्चा माझ्या पाठीवर दोन्ही हातांनी दाबलं आणि थोडं बरं वाटलं . पुन्हा चालणे सुरु केलो ; पण एसआरटी विद्यापीठाच्या समोर पुन्हा त्रास वाढला . पुन्हा जाधव गुरुजी ने पाठीवर दबणं सुरु केलं पुन्हा थोडंसं बरं वाटलं . कसाबसा घरी आलो . तशाही परिस्थितीत सहा सात किमीचं अंतर चालून पूर्ण केलो .

        बोलणं बंद . श्वास घेण्यास त्रास . मी आगदी अखडून गेलो होतो . असह्य झालो होतो .

        घरी आलो बायकोला उठवलो . सोबत लक्ष्मण होताच . त्याने पळत जावून मेडीकल मधून कोणतीतरी पित्तशामक गोळी आणली . मी ती गोळी खाल्लो .माझी बायको घाबरून गेलेली तिलाच दरदरुन घाम फुटला .ती पुरती घाबरली . कावरीबावरी झालेली . मी हातवारे करून कुठलातरी बाम पोटावर चोळण्यास सांगितलो . ती घाबरलेल्या आवस्थेत काय करत होती हेही तिला कळत नव्हते . ती घाबरलेल्या आवस्थेत बाथरूमला निघून गेली . मी बामची शिसी उचलली व जेवढं लावता येईल तेवढं बाम पोटावर छातीवर लावून आडवा झालो . झोप कधी लागली कळाले नाही . नंतर मी ठिक नऊ वाजता उठलो . मला वाटलं आता बरा झालो ; पण पुन्हा हळूहळू दुखने सुरु झाले .

              मग मात्र डॉ . मनोज पाटणी जुनामोंढा येथे लक्ष्मण मला घेवून गेला . पाटणी साहेब आगदी घरच्या सारखे समजावून सांगितले .तात्काळ हृदयाच्या डॉक्टरांना दाखवा म्हणाले. त्यांनी नांदेड मधील एका प्रसिद्ध दवाखान्यातील डॉक्टर साहेबांना चिठ्ठी दिली . ती चिठ्ठी घेऊन आम्ही दोघं त्या डॉक्टर कडे गेलो . रविवार होता .दवाखान्यात वर्दळ कमी . तेथे बऱ्याच तपासण्या करून सहा गोळ्या दिल्या व सोमवारी येण्यास सांगितले . सोमवारी सकाळी गेलो . हृदयाची तपासणी केली डॉक्टर साहेबांनी . रक्ताची तपासणी केली . टूडी इको , सोनोग्राफी झाली . पुन्हा पुन्हा रक्त तपासणी झाली . पोटाच्या डॉक्टरांनी तपासणी केली . व निदान केलं यकृताला सूज आली आहे व पित्ताशयात खडा आहे . खडा कुठल्यातरी रक्तवाहिणीत आडकल्यामुळे त्रास झाला म्हणाले . लवकर शस्त्रक्रीया करून घ्या डॉक्टरांनी सल्ला दिला . नाही तर ॲटक येवू शकते .

         तरी  मी म्हटलं साहेब शस्त्रक्रिया केली नाही तर काय होईल ? ते म्हणाले , "काय होईल भविष्यात यकृत कामातून जाईल . हार्ट अटॅक येईल ." मग मी म्हणालो , साहेब चांगल्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचं नाव सांगा . ते तुसडेपणाने म्हणाले , " मी सांगणार नाही . तुमच्या तुम्हाला पहा . " माझी बोलती बंद . मी रविवार ,सोमवार व मंगळवार हे तीन दिवस तपासणीत घातले . साठी ओलांडली तरी यापूर्वी कधीही मला स्वतःसाठी दवाखाना कधी माहित नव्हतं . "काहीही करण्यापूर्वी पैसे भरा मग तपासणी ." आता मला दवाखाना चांगला कळाला . पैसा असेल तर दवाखाना . येथे दया , माया सहानुभूती कुठे दिसली नाही . सर्वाना पैसा प्यारा . सर्व निर्विकार चेहऱ्याचे माणसं पैसा घेण्यासाठीच बसलेत असे वाटत होतं .

              मी शस्त्रक्रिया करवूण घेण्यापूर्वी काही डॉक्टरांचं सल्ला घेतलो . काही मित्रांचाही सल्ला घेतलो त्यात माझे बंधूतुल्य आवचर सर , नारायणराव बनसोडे , आनंदराव सूर्यवंशी , विठ्ठलराव आचणे , काशीनाथ वाघमारे व डॉ . संगिता आवचार,त्याचं म्हणणं पडलं शस्त्रक्रिया करणे गरजेचं आहे . मग मी शस्त्रक्रीयेसाठी शेवटचा सल्ला घ्यावा म्हणून नांदेड मधील रेनबो हॉस्पीटल गाठलो . दवाखान्यात प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजवा लागतो हे येरवी माझ्या लक्षात आलं होतं . येथे मी सल्ला घेण्यासाठी आलो होतो . यापूर्वी जेथेजथे सल्ला घेतलो तेथेतेथे रु .पाचशे मोजावे लागले होते . आता हा शेवटचा सल्ला घ्यावा रु . पाचशे त्यांना द्यावे म्हणून मी येथे आलो होतो . डॉक्टर साहेब आत बसलेले दाराच्या फटीतून दिसले .  कॅबीनसमोर बसलेल्या एका बाईस मी विचारून आत मध्ये गेलो . आत खुर्चीत बसलेला चेहरा प्रसन्न वाटलं .हासून स्वागत केल्यासारखंच मला भास झालं . खरं तर मी तनावात होतो . पण डॉक्टरांचा हासरा चेहरा पाहून तनाव पार पळून गेलं . रंग गोरा . टपोरे डोळे . दिसायाला सुंदर . तेवढचं मनाने निर्मळ हा डॉक्टर आहे नाव आहे गोपाल चव्हाण .

         थोडयाशा गप्पा गोष्टी झाल्यानंतर माझ्या मनावरचं बोजा , तान तनाव खूपच कमी झालं . डॉक्टर साहेबांना माझी फाईल दाखवली . मन लावून फाईल त्यांनी पाहिली . शस्त्रक्रिया करावी लागते म्हणाले . मला वाटलं आता पर्याय नाही . मी म्हणालो , हो साहेब मी तयार आहे . शस्त्रक्रिया कोठे करायची ?" डॉक्टर म्हणाले , " मीच करतोय आपल्या येथे सोय आहे ." मी म्हणालो ," साहेब खर्च किती येईल?" येथे माझे कान मी डॉक्टर साहेबांच्या बोलण्याकडे रोखलो होतो . याचं कारण मागील तीन दिवस आगोदर पैसा घेतल्या शिवाय कोणीही व कोणतीही तपासणी केली नाही . " तपासून घ्यायचं का? ओ काका येथे पैसे भरून पावती घ्या व मग पुढे जा " हे मी ऐकलो होतो . आता हे तर शस्त्रक्रीया करणार म्हणजे आगोदर किती हजार भरण्यास सांगतात असे मला वाटत होते .यापूर्वी मी हे दुसऱ्या पेशंटसाठी अनुभवलो होतो. डॉक्टर मंद हसत म्हणाले , " जीवनात पैसा सर्व काही नाही . तुम्ही पैशाची चिंत्ता अजिबात करू नका . पैसा ही भरू नका . फक्त सात आठ हजार रुपये मेडीकलचा खर्च सोबत घेवून या . बाकीचा खर्च शस्त्रक्रिया झाल्यानंतर पाहू . पैशाची चिंता करू नका ." येथेच या डॉक्टरातील माणुसकी मला दिसून आली . मी आवक झालो . क्षणभर माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले नाही .

                 मला नवल वाटलं पापांचं बाप पैसा तरी पैशा कमविण्याच्या मागे धावनाऱ्या दुनियेत असा ही माणुस आहे . ज्यांनी खरा डॉक्टरकीचा मार्ग स्विकारलेले आहे . पैसा काढण्यापेक्षा रोग्यांनां मदत करू पहणारा हा डॉक्टर म्हणजे भूतलावरचं देव ;पण आज किती डॉक्टर पैशापेक्षा पेशंटची काळजी घेताना दिसतात . प्रथम येवढी रक्कम भरा व नंतरच दवाखान्यात पाऊल ठेवा असे म्हणणारे डॉक्टर पावलोपावली भेटतात . पण माणुसकी जपणारे , पैशापेक्षा आपल्या पेशंटला महत्व देणारे डॉक्टर गोपल चव्हाण सारखे किती सापडतील? याचं उत्तर जवळपास या पैशाच्या दुनियेत नाहीच असे द्यावे लागेल असे माझे मत आहे.

           डॉ . गोपाल चव्हाण यांच्या समोर मी बसलेला . पैशाची चिंता करू नका म्हणून मला धीर देत असताना एक गरिब मुस्लामन दवाखान्यात आला . त्यांनी डॉक्टर साहेबांना हात जोडून सांगितलं साहेब मी गरिब आहे . माझ हे पेशंट सिरियस आहे . माझ्याकडे आता पैसे नाहीत . उद्या मी पैशाची जोड करीन मला रक्ताची गरज आहे . डॉ गोपाल चव्हाण यांनी त्या पेशंट साठी ताबडतोब सोय केली . पैसा नाही मागितलं दवाखाण्यात अडमीट करून घेतलं . त्यासाठी ना ॲडव्हान्स ना काही नाही .

        या वेळी माझ्या मनात एकच विचार येवून गेला . या पृथ्वीतलावर आणखी काही लोक चांगले आहेत . माणुसकी पेरत आहेत ते जपत आहेत . संकटात पैशापेक्षा जीव महत्वाचं म्हणून मदत करत आहेत . गरिबांचे वाली आहेत शिल्लक !!

          डॉ . गोपाल चव्हाण यांनी माझं पिताशयाचं ऑपरेशन केलं . तीन दिवस मी रेनबो मध्ये होतो . रेनबोतील डॉ . गोपल चव्हाण यांच्या मनाचे आनंदी सप्त रंगपाहून माझंही मन प्रसन्न झालं. ऑपरेशनचं दुःख तर कुठे पळून गेलं यांचा पत्ताच लागला नाही .सप्तरंग पाहून क्षणभर का होईना मनातील दुःख विसरले जाते . माझे मार्गदर्शक बंधू आवचार सर ,माझी बायको , मुलं व सूनबाईचा चेहरा मलूल झालेलं होतं . डोळे सर्वांचे पाणावले होते . त्यांनी आश्रूनां वाट मोकळी करून दिली होती . मी मात्र एकाच विचारात गुंग झालो होतो डॉ गोपाल चव्हाण या सारखे माणुसकी जपणारे किती डॉक्टर असतील बरं?

राठोड एम आर
M.R.RATHOD

“गोमती सावली ” काळेश्वरनगर , विष्णुपूरी, नांदेड – ६
९९२२६५२४०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *