क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीतील पुर ओसरल्याने राजीव सागर पुलाला अडकले पुरसन

कंधार ; दत्तात्रय एमेकर

निसर्गाच्या अवकृपेमुळे पावसाने गेल्या आठवड्या पासून थैमान घातले.नदी-नाले दुथडीने वाहू लागले.राज्यातले सर्व पुलं पाण्याखाली होते.दळणवळणं ठप्प झाले.अनेकांना जिव गमवावा लागला.

अनेक धरणं ओसंडून वाहू लागले.आमच्या मन्याड खोर्‍यातील मानार प्रकल्प सुध्दा गेली एक महिन्यापासून ओहरफ्लो होत आहे.माझ्या क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरी जवळ पंडित नेहरु यांच्या रक्षेचे विसर्जन स्वातंत्र्य सैनिक दिवंगत अनंतराव मामडे यांच्या प्रयत्नांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार, तत्कालीन आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या संकल्पनेतून, माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या सहकार्यातून तत्कालीन जि.प.अध्यक्ष यांचे उपस्थित मन्याड नदीच्या प्रवाहित पाण्यात विसर्जित केली .

तेव्हापासून या घाटाला शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपुरा हे नामकरण करण्यात आले.तेव्हापासून बहाद्दरपुरा शांतीघाट विकास समिती कार्यान्वित झाली.

शांतीघाट येथील राजीव सागरावर असलेल्या सेतूवरुन पाणी पाच फुटा पर्यंत वाहत होते.काठावर असलेले नेहरू बालोद्यान, श्री कालप्रियनाथ केशवेश्वर लिंग मंदिराच्या सम पातळीवर विठ्ठल पायरीला पाणी पोहंचले. समाधी ही पाण्याखाली,जलेश्वर देखील महिने-दोन महिने पाण्याखाली. तसेच आमच्या नगरीचे चीरशांतीधाम पाण्यातच!रोपवाटिकेत पाणी शिरले.वाहतूक ठप्प झाली.

अनेक गावाचा तालूक्याशी संपर्क तुटला.अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.आता पाणी ओसरले.पण शांतीघाटवरील पुलाला पुरसन अडकले.

अनेक छोटे-मोठे ओंडके वाहून आले.आज शांतीघाट परीसरात फेरफटका मारला आसता हा पुरसनाचा थर पाण्यावर तरंगतांना नजरेस पडले.त्यात अनेक छोट्या-छोट्या वस्तू पाण्याच्या प्रवाहात वाहून आल्या.

पुलाच्या पश्चिम दिशेला पुरसन जास्तीचे अडकले आहे.या पिढीस पुरसन पाहणे दुर्मिळ झाले.कारण वृक्षतोड केल्यामुळेच पाऊस लहरीपणा करत आहे.शेतकरी राजा हवालदिल झाला.हाता-तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला.

पडला पाऊस ढग फुटी, नाहीतर कोरडा दुष्काळ.अतिवृष्टीत अन् कोरडा दुष्काळ दोन्ही कडून जगाचा पोशिंदा भरडला जातो.असे असले तरीपण ओला दुष्काळ परवडतो.

(सुंदर अक्षर काार्यशाळा कंंधार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *