कंधार ; प्रतिनिधी
आज रविवार दि.०३/१०/२१ अमृत महोत्सव दिनानिमित्त मोफत कायदेविषयक व जनजागृती शिबिर, बौध्दव्दार बुद्धविहार कंधार या ठिकाणी संपन्न झाले.
कायदेविषयक मार्गदर्शन व जानजागृती शिबीर बौध्दद्वार बुद्ध विहार कंधार येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक अतिरिक्त जिल्हासत्र न्यायाधीश अतूल सलगर , प्रमुख पाहुणे ऍड. के.एस.श्रीसागर, अध्यक्ष अभिवक्ता संघ कंधार , ऍड.के.एस. अन्सारी उपाध्यक्ष अभिवक्ता संघ कंधार ,ऍड.आर. जी.ढवळे या मान्यवारांनी सविस्तर कायदे विषयक मार्गदर्शन केले.
कार्यकमांसाठी माजी नगराध्यक्ष रामरावजी पवार
,बी.सी.कांबळे ,आर.एन. गायकवाड ,सुदाम मोडके, ना.ना.गायकवाड ,मोहन कांबळे ,बालाजी कांबळे ,मधुकरराव कांबळे ,अमोल कांबळे चंद्रकांत फुके व्यापारी, माधवराव कांबळे ,कपिल कांबळे ,पत्रकार एन.डी.जाभाडे,बबलू गायकवाड ,राजू कांबळे,कुणाल कांबळे व बौध्दाचार्य विनोद कांबळे व इतर महिला व पुरुष होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बौध्दाचार्य प्रसेनजित ढवळे यांनी केले तर शिवजी चव्हाण न्यायालयीन कर्मचारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.