लोहा / प्रतिनिधी.
लोहा तालुक्यातील सर्वात मोठी जुनी व पालक व विद्यार्थ्यां विश्वास संपादन करणारी उज्ज्वल यशाची परंपरा म्हणून ओळखली जाणऱ्या श्री संत गाडगे महाराज माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या दीड वर्षाच्या कालावधीनंतर आज दि. ४ ऑक्टोंबर रोजी शाळा सुरू झाली असता विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व जंगी स्वागत करण्यात आले
गेल्या दोन वर्षांपासून लोहा शहरासह राज्यात व देशात कोरोना या संसर्गजन्य रोगांने थैमान घातले आहे.
शासनाच्या वतीने कोरोना टाळण्यासाठी व कोरोनाला हरविण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या लाॅकडाऊन लावले,शाळा , महाविद्यालये, देवालय बंद केले. कोरोना टाळण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर सुरू केली आहे.आता कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे राज्यात शासनाने दि.४ ऑक्टोंबर पासून शहरी भागात ८ वी ते १२ व ग्रामीण भागात ५ वी ते १२ वर्ग सुरू केले आहेत.
शासनाने कोरोनाचे अटी व नियमांचे पालन करुन सोशल डिस्कशन पाळून, तोंडाला मास्क लावून , हाताला सॅनिटाझर लावून लोहा येथील श्री संत गाडगे महाराज माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी इयत्ता ८ वी ते १२ वी चे नियमित वर्ग सुरू करण्यात आले.
यावेळी आज यंदाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी लोहा येथील श्री संत गाडगे महाराज माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अनेक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली यावेळी या विद्यार्थ्यांचे पॅड व पुष्प देऊन संस्थेचे अध्यक्ष भाई प्रा. पुरूषोत्तम धोंगडे, लोहा पं. स. चे. गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच आज शाळेच्या पहिल्या दिवशी लोहा येथील श्री संत गाडगे महाराज माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयास पुष्पहारानी , रंगी बेरंगी फुग्यानी सजविले होते शाळेच्या प्रांगणात सुंदर रांगोळी काढण्यात आल्या झेंडूचे लावण्यात आली.
विद्यार्थ्याचा सत्कार करण्यासाठी झेंडूची फुलांची ही सजावट करण्यात आली. देशभक्तीपर गीते लावण्यात आले.
या अभूतपूर्व जंगी स्वागताने विद्यार्थी भारावून गेले सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला
श्री संत गाडगे महाराज माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ३१०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांंचा एवढा जंगी स्वागत करणारी नांदेड जिल्ह्यांतील एकमेव शाळा ही श्री संत गाडगे महाराज ठरली.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत गाडगे महाराज माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री,बोधगिरे सर, शालेय समितीचे सदस्य उत्तम घोरबांड सर, उपमुख्याध्यापक बी.आर.पाटील,उपप्राचार्य दापेकर सर, पर्यवेक्षक सुर्यवंशी सर, गोपाळ तेलंग, एकनाथ जाधव, अमोल शेंडगे, बालाजी चव्हाण, बी डी जाधव, मारोती पाटील बोरगावकर, हरी शिंदे, चव्हाण सर,मानव विकास बसचे वाहक,चालक यांच्या सह सर्व शिक्षक ,शिक्षकोतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी डी जाधव सर यांनी केले.