अहमदपूर ( प्रतिनिधी ) ह.भ.प.मोहनदास महाराज यांनी प्रकाशनासाठी तयार केलेल्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जनजागृती विशेषांकाचे येथे दि ०८ आक्टो २१ रोजी करण्यात आले.
युवाकिर्तनकार ह.भ.प.मोहनदास महाराज पवार, श्री राधाकृष्ण मंदिर सेवाधाम, श्रीक्ष्रेत्र पैठण, यांनी महत्प्रयासाने , ” हरित क्रांतीचे प्रणेते,वसंतराव नाईक, जनजागृती विशेषांक , २०२१ ” महानायक वसंतराव नाईक यांच्या ४२ व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने तयार केला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन दि ०८ आक्टो २१ रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.
या विशेषांकात प्रामुख्याने, गुरुशिष्य परंपरा हा डॉ पुनम चव्हाण यांचा लेख, वाचनसंस्कृतीच्या अभावामुळे बंजारा समाज विकासापासून दूर ,हा रतन आडे, हिंगोली यांचा लेख, हरित क्रांतीचे प्रणेते : वसंतराव नाईक, हा अर्जुन चव्हाण, बीड यांचा लेख, शुन्यातून विश्व निर्माण करणारे : वसंतराव नाईक, डॉ रमेश चव्हाण औरंगाबाद यांचा लेख, नाईक साहेब तुम्हाला परत यावेच् लागेल, हा ” याडीकार ” पंजाब चव्हाण यांचा लेख आणि वसंतराव नाईक हे शेतकरी – कष्टकऱ्याचे कैवारी, हा एन डी राठोड, अहमदपूर यांचा लेख आहे.
याशिवाय, आयुष्य जगेरो सोपा गणित हे रघुनाथ गुरुजी औरंगाबाद आणि समाज प्रबोधनपर भजन, हे ह.भ.प.मदन महाराजांच्या काव्यपंक्ती आहेत. तर शुद्ध धर्म क्या है ? हा डॉ श्रीराम राठोड, नाईक साहेबांची थोडक्यात माहिती, सचिन गणु पवार यांचे पण लेख आहेत.
शेवटी वसंतराव नाईक यांचा जीवनपट आहे.
या छोट्याशा प्रकाशन समारंभास दस्तुरखुद्द मुख्य संपादक ,युवाकिर्तनकार ह.भ.प.मोहनदास महाराज, जेष्ठ साहित्यीक तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एन डी राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे, अल्पसंख्याक सेल, जिल्हा उपाध्यक्ष बाबुभाई रुईकर, सामाजिक कार्यकर्ते असिफ पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल अहमदपूर ता अध्यक्ष नाजीमभाई शेख, प्रा भगवान आमलापुरे आणि जावेदभाई बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.