कंधार:
भवानीनगर कंधार येथिल
मंदिर राष्ट्रकूटकालीन आहे. या ठिकाणी घनदाट जंगल होते. त्यावेळी हेमाडपंथी वास्तूकलेचा उत्तम नमुना हे मंदिर होते.
त्यावेळी कंधार शहरातील सर्व जनता विजयादशमीच्या सीमोल्लंघन करत आणि आपट्याचे सोने लुटतं. कंधार शहरात प्रतिष्ठित मंडळी होती.
त्यांनी एकत्र येऊन अष्टभुजा देवीचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर हनुमान मंदिराचा प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर भवानी मंदिराच्या उत्तरेकडे बारा ज्योतिर्लिंगचा स्थापना झाली.
त्यानंतर त्यांना वाटले भगवान बालाजी देखील या परिसरात असायला हवेत. तेव्हा छोटेखाणी बैठक घेतली. त्यानंतर अनेकांच्या देणगीतुन भगवान बालाजी मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.
आजचे वैभव आपण जे पाहतो ते पूर्वीपासून या मंदिरासाठी झटणाऱ्या मान्यवरांचे श्रेय आहे.
मंदिरात आरती, अभिषेक, कुंकुम अर्चन, भागवत कथा, बच्चे कंपनी साठी खेळण्याची विविध साधने, लहान छोटे व्यापारी, प्रसादाची, पूजेची आणि खेळणीची दुकाने थाटून नवरात्र महोत्सवाची रंगत वाढवितात. 9-10 दिवस याठिकाणी यात्रेचे स्वरूप दिसते.
भागवत कथामालेमुळे वातावरण धार्मिक भक्तीने ओतप्रोत होते. अनेक वेळा मोठ्या मोठया लक्ष्मण शक्तीचे कार्यक्रम देखील मोठ्या भक्ती भावाने साजरे होतात.
या मंदिर परिसराची उत्तरोतर प्रगती व्हावी, ही सर्व कंधार वासिया व कंधार पंचक्रोशीतील भावकांची मनोकामना आहे. आता या भवानी नगर ट्रस्टीचे अध्यक्ष नगरसेवक शहाजी नळगे हे आहेत. त्यांच्या देखरेखी खाली व नियोजनात सर्वच कार्यक्रम संपन्न होत आहेत.