फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शाळेत शिकत असलेल्या अभिषेक किशनराव जाधव या विद्यार्थ्याची कुस्ती या मर्दानी खेळासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली असून हि निवड राष्ट्रीय ग्रापलिंग कुस्ती स्पर्धा २०२१ गुणवंत व्यायाम शाळा व सांस्कृतीक क्रिडा मंडळ रामनगर जालना यांच्या मार्फत ता १७ आक्टोबंर २०२१ रोजी वयो गट १६ ते १७ वजन ६६ किलो मधुन उत्कृष्ट खेळाडु म्हणून निवड करण्यात आली असल्याने सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
मन्याड खोऱ्याच्या ग्रामीण भागात शिक्षण घेत आपल्यातील कौशल्य व जिद्द पणाला लावत अभिषेक जाधव यांनी योगेश भुमरे जळगाव या प्रतिस्पर्धकासोबत कूस्ती खेळुन अवघ्या दोन मिनीटात बाजी मारली , खेळाडु अभिषेक किशन जाधव हा विद्यार्थ्या १९ आक्टोबंर रोजी राष्ट्रीय पातळीवर निवड होताच दिल्ली येथे रवाना झाले .
यावेळी
जालन्याचे पालकमंञी तथा आरोग्यमंञी (म.रा.) राजेश टोपे , मा.ना.कैलास सेठ गोरट्याल आमदार जालना , प्रशांत नवघीरे (महासचिव ग्रापलिंग कमिटी महाराष्र्ट) यांच्या हस्ते सूवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली सर्व खेळांडुची जालन्यात वाजत गाजत मिरवनुक काढुन राम नगर येथे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व नागरी सत्कार करण्यात आला.
खेळाडुचा सर्वस्तरातुन व शाळेचे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे, पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे, संस्थेचे सचिव शिवाजीराव केंद्रे, सहशिक्षक अमित लोंड यांनी त्याचे अभिनंदन केले व रामानुजन कुस्ती आखाडा माळाकोळी येथील प्रशीक्षक रोहिदास कागणे (उत्कृष्ट मल्ल) यांनी प्रशिक्षण देउन खेळाडुला उत्तेजन दिले.