माळाकोळी ; एकनाथ तिडके
माळाकोळी येथील कुस्ती आता सातासमुद्रापार गेली आहे… माळाकोळी चा लौकिक अनेक क्षेत्रात देशभरात वाढत असताना आता माळाकोळी ची कुस्ती सातासमुद्रापार म्हणजेच परदेशात पोहोचली आहे… दिल्ली येथे झालेल्या ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत माळाकोळी येथील पाच मल्लांनी सहभाग नोंदवला होता , यातील लखन भगवान कागणे या मल्लाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून आगामी काळात अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत लखन कागणे सहभागी होणार आहे.
दिल्ली येथे झालेल्या ग्रप्पलींग कुस्ती स्पर्धेत माळाकोळी येथील पाच मल्ल लखन भगवान कागणे ,दीप रोहिदास कागणे, अभिषेक किशन जाधव, कृष्णा कैलास फुलारी, श्रेयस भालचंद्र मुस्तापुरे यांनी सहभाग नोंदवला होता दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत या पाचही मल्लांनी आपली छाप सोडली , सुवर्ण पदक व इतर पदके पटकावली यातीलच लखन भगवान कागणे याने सुवर्णपदक पटकावत अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे,माळाकोळी येथील रामानुजन कुस्ती आखाड्याचे प्रमुख रोहिदास कागणे यांच्या अथक प्रयत्नातून माळाकोळी ची कुस्ती आता परदेशात पोहोचली आहे मागील अनेक वर्षांपासून ते माळाकोळी येथे कुस्ती स्पर्धेसाठी मुलांना प्रशिक्षण देतात.त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून माळाकोळी च्या मल्लांनी दिल्ली गाजवली तसे आता परदेशातही माळाकोळी ची कुस्ती पोहोचली आहे.
माळाकोळी या मल्लांचा सत्कार
राष्ट्रीय स्पर्धेत छाप पाडल्यानंतर गावी परतलेल्या या पाचही मल्लांचा गावात ग्रामस्थांनी सत्कार आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माणिक डोके, प्रताप सिंह बयास गुरुजी, माधव महाराज केंद्रे ,सतीश कुलकर्णी, रोहिदास कागणे, भास्कर पाटील तिडके, बालाजी तेलंग, रामजी कागणे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी या पाचही मल्ल व त्यांच्या पालकांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करून कौतुक करण्यात आले , यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माणिक डोके म्हणाले , मैदानी खेळामुळे खिलाडू वृत्ती निर्माण होते शरीर तंदुरुस्त राहते , सध्याच्या आधुनिक काळात लहान मुलांच्या हाती मोबाईल रुपी खेळणे आल्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी मुलांना जडत आहेत त्यामुळे मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलांना परावर्त करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी रामजी कागणे प्रतापसिंह बयास रोहिदास कागणे सतीश कुलकर्णी माधव महाराज केंद्रे यांचीही भाषणे झाली, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत तिडके यांनी केले.