वारकरी परिषदेच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध; सौ. आशा ताई शिंदे
लोहा( प्रतिनिधी)
लोहा शहरातील मुक्ताईनगर येथे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने 10 वा वर्धापन दिनानिमित्त वारकरी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.ब.प लक्ष्मीकांत महाराज, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून लोहा ,कंधार मतदार संघाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे प्रमुख उपस्थित होत्या, यावेळी वारकरी परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी वारकरी परिषदेत बोलताना म्हणाल्या की वारकरी परिषद व सर्व वारकरी महाराज, वारकरी ,भजनी मंडळास कोणतीही अडचण आल्यास ती अडचण सोडवण्यासाठी मी व लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी सौ. आशाताई शिंदे शिंदे यांनी स्पष्ट केले व लोहा येथे वारकरी भवन उभारण्यासाठी मी लवकरच प्रयत्न करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी यावेळी वारकरी साहित्य परिष
लताना स्पष्ट केले .यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते वारकरी परिषदेच्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी ह. भ .प एकनाथ महाराज ,हभप बंडू महाराज, हभप रंगनाथ महाराज ताटे, अर्जुन पवार, मस्की कर, चंद्रकांत डोके, प्रसाद जाधव ,शुभम कदम, गोविंद हापगुंडे सुदर्शन शेंबाळे,
सचिन कल्याणकर सह कार्यकर्ते, पदाधिकारी, वारकरी, भजनी मंडळाचे वारकरी, मोठ्या संख्येने महिला वर्ग, व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.