लसाकम नांदेड च्या वतीने क्रांतीगुरू लहूजी साळवे यांच्या जयंती निमित्य गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संपन्न

नांदेड ; प्रतिनिधी

लसाकम नांदेड या सामाजिक संघटनेने दिः 14-11-2021 रोजी क्रांतीगुरू लहूजी साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून दुपारी 3.00 वा कुसुम सभागृह नांदेड येथे मातंगसमाजातील SSC,
HSC गुणवताधारक, IIT,NIT,MBBS,BDS,
BAMS,B PHARMCY, SET,NET व PHD पाञ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करून गौरव करण्यात आला .

यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष : प्रा सी एल कदम (लसाकम जिल्हाध्यक्ष ) प्रमुख वक्ते : मा.बालाजी थोटवे (प्रदेशाध्यक्ष,लसाकम )
प्रमुख उपस्थित : मा.सुरेंद्रजी घोडजकर ( प्रदेश सचिव , काँग्रेस कमिटी महा . )
मा .व्ही.जे.वरवंटकर ( माजी सनदीअधिकारी ) मा . सुग्रीव अंधारे ( कार्यकारीअभियंता मनपा, नांदेड )
मा . प्रकाश कांबळे ( सहा .अभियंता मनपा,
नांदेड )मा.निरंजनतपासकर( अध्यक्षमराठवाडा ,
लसाकम )
मा .पी एल दाडेराव
( कोषाध्यक्ष, महाराष्ट्र लसाकम )
व जिल्हाभरातून मोठया प्रमाणात विद्यार्थी पालकासह उपस्थित होते .

परिवर्तनवादी महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . प्रमुख वक्ते मा . बालाजी थोटवे सरांच्या वक्तव्याने समाजाविषयी तळमळ , सध्यस्थिती, वैचारिक प्रेरणा मिळाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार करण्यात आला.

गुणवंतापैकी प्रतिनिधिक स्वरूपात एमबीबीएस पाञ विद्यार्थी शिवराज जांभळीकर यांनी मनोगत व्यक्त केले .
प्रस्ताविक : मा. माधव कांबळे ( सहसचिव लसाकम ) सुत्रसंचलन : मा. संजय मोरे
( जिल्हा सचिव लसाकम) यांनी केले.मा . नामदेव कंधारे ( कार्यकारी सदस्य ) यांनी उपस्थितीतांचे आभार मानले .

…. कार्यक्रम यशस्वी व खूप सुंदर झाला…
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
जिल्हा कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी मा . संजय मोरे, डॉ .के पी गायकवाड प्रा . शिवाजी सूर्यवंशी , माधव कांबळे, गं .ई कांबळे, कामाजी गाडीवान,
एस एन जांभळीकर , बालाप्रसाद भालेराव, नामदेव कंधारे, मारोती भाटापूरकर व समस्त लसाकम परिवार नांदेड यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *