माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी व जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकर श्री वृषभ यांच्या मर्तीची केली पाहणी

कंधार

भारताचे लोहपुरूष, व पहिले गृहमंत्री मा.सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य दिव्य स्मारक(स्टॅच्यू ऑफ युनिटी) व जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकर श्री वृषभ यांच्या भव्य 108 फूट अखंड दगडी मूर्तीची पाहणी व भेट दौरा माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब पाहणी केलेला दौरा केला.

  दिनांक 9/ 11 /2021 शेकाप पक्षाचे माजी आमदार व जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी, भाई गुरुनाथराव कुरूडे बंधू प्रा. वैजनाथराव कुरूडे, नांदेड शाळेचे अधीक्षक श्री सूर्यकांतराव कावळे ,भाई निलेश गायकवाड ,भाई बळीराम पेटकर (सारथी)व रमेश जोगदंड यांनी स्वतःच्या गाडीने वरील दोन्ही महान तिर्थां चा दौरा करून पाहणी केली .

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील “मांगी तुंगी “चा डोंगर जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकर वृऋभदेव यांची 108 फुटाची अखंड पाषाणात कोरण्यात आलेली .उभी मूर्ती पाहिली मांगी-तुंगी या च्या समुद्र सपाटी पासुन 4500 फूट उंचीवर असलेल्या ,दगडी पाषाणाच्या  डोंगरात सुमारे 108 फूट उंचीवर ही उभी मूर्ती त्याचा लोकार्पण सोहळा राष्ट्रपती कोबिंदजी व जैन धर्मीयांच्या नन यांच्या हस्ते दि.22/10/20018 साली स्थापित करण्यात आलेली असून, वेरूळच्या कैलास लेण्यात सारखे वरून दगड कोरित ही भव्यदिव्य मूर्ती कोरण्यात आलेली आहे .

या कार्यासाठी19 वर्षाचा कालावधी लागला असे कळाले .जैनधर्मीय याचे हे ठिकाण, भारतातलेच नाही तर संपूर्ण जगात प्रथम असे आहे .जैन धर्माचे हे  महत्त्वाचे ठिकाण आहे या मूर्तीचे वर जाण्याचा मार्ग पायऱ्याची आधीचे काम तब्बल एकोणीस वर्षे चालू होते असे कळाले .

अशीच बाहुबली ची मूर्ती 55 फूट उंचीची दगडी मूर्ती दक्षिणेतील कर्नाटक श्रवणबेळ्गोळ येथे असून तिचे हि दर्शन काही वर्षा पूर्वी घेतलेले आहेत. ही दोन्ही स्मारके व पवित्र ठिकाणे, म्हणजे जैन धर्मीयांची महत्त्वाचे ठिकाणे समजली जातात .तसेच जैन धर्मियांचे मंदिर भारतात अनेक ठिकाणी असून इतर कोणत्याही (बौध्द मंदीरे सोडली तर)धर्माची अशी मंदिरे क्वचितच पहावयाला मिळतात.

पुरातन काळातील अशी अनेक मंदिरे व शिल्पे भाई कुरूडे यांनी पाहिलेली आहेत .

दिनांक 11/11 2021 रोजी गुजरात राज्यात उभारण्यात आलेली भारताच्या लोहपुरुष, भारताचे पहीले  गृहमंत्री यांचे भव्यदिव्य असे सुमारे एकशे 597 फोटो म्हणजेच 182 मीटर उंचीची सरदार सरोवर ,,साधू बेटावर ,सरदार वल्लभाई पटेल यांचा भव्य पुतळा गुजरात सरकारने व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने उभारले आहे.त्यांचा लोकार्पण सोहळा दि.31/10/2018रोजी संपन्न झाला. शेकडो एकर जागेत हे स्मारक उभारले असून, हा परिसर सुशोभित करण्यात आला आहे .

पुतळा पाहण्याची सोय जनतेसाठी अत्यंत योग्य व सहजतेने पाहता येण्यात सारखी व्यवस्था करण्यात आली आहे. हे स्मारक तर भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे भव्यदिव्य व भारताची शान म्हणून उभे आहे. दररोज देशातून हजारो स्त्री पुरुष मुले यास या स्मारकाच्या दर्शनासाठी येतात व पाहून अवाक् होतात .लोहपुरुष व भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी तर खूप मोठे आहे .परंतु आम्हा हैदराबाद संस्थानाला बरखास्त करून भारतात सामील होण्यास अत्यंत मोलाचे कार्य आहे .

निजामाला शरण आणण्यात केवळ वल्लभभाई पटेल यांची यांचेच श्रेय आहे .कोरोणा चालू असतांनाच सुद्धा स्मारकाला हजारो लोक दररोज निष्ठेने येतात. व स्मारक पाहून आनंदून जातात हेच, स्मारक खऱ्या अर्थाने भारताची शान ठरले आहे. व  त्यास जागतिक महत्त्व प्राप्त झाली आहे.

जास्तीत जास्त भारतीयांची या स्मारकात ला जरूर भेट द्यावी ,असे मत भाई गुरुनाथराव कुरूडे साहेबांनी व सहकाऱ्यांनी जनता जनार्दन यांना  केली आहे. पुतळा असा हुबेहूब व अचूकतेने तयार केला असून कलाकाराचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *