कुरुळा ; विठ्ठल चिवडे
मागील अनेक वर्षांची परंपरा असणारी दिग्रस येथून एकात्मतेचे प्रतीक असणाऱ्या मन्मथ ज्योती मशालीचे कपिलाधारच्या दिशेने प्रस्थान झाले.मजल दरमजल करत ही अखंड तेवत असणारी मशाल कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी मन्मथ माऊलीच्या चरणी स्थिरावनार असून अनेक भाविक या मशाल पदयात्रेत सहभागी झाले आहेत.
कुरुळा येथून जवळच असलेल्या दिग्रस(बु) येथून मागील सोळा वर्षांपासून मन्मथ ज्योत मशाल कपिलाधारच्या दिशेने मार्गस्थ होते.अविरत चालणाऱ्या या परंपरेत मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग असतो.यंदाही गुरुराज माऊलीच्या जयघोषात तिमिराला प्रकाशमान करणारी मशाल हाती घेऊन सुमारे सव्वाशे युवक कपिलाधारच्या दिशेने निघाले आहेत.कुरुळा, अहमदपूर,
कुंबेफळ,घाटनांदूर,अंबेजोगाई,नेकनूर,मांजरसुम्बा मार्गे १७० की मी अंतर या पदयात्रेत कापल्या जाते.ता.१७ बुधवारी निघणारी ही मशाल ता.१९ रोजी कपिलाधार येथे स्थिरावणार आहे.या पदयात्रेचे ठिकठिकाणी हर्षोल्हासात स्वागत केले जाते.ठिकठिकानी गावकऱ्यांकडून अगमनस्थ भाविकांच्या चहा फराळ व जेवणाची व्यवस्था केली जाते.मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने उत्साहाला बाधा पोहोचत होती.परंतु यंदा मात्र गुरुराज माऊली…. मन्मथ माऊली च्या जयघोषात भाविक कपिलाधारच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.