मुखेड -ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथील माजी प्राचार्य तथा हिंदी विभागात कार्यरत प्रा.डॉ रामकृष्ण बदने यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ( PROTAN) विंगच्या वतीने त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय ‘राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार’ आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी आकाश फंक्शन हॉल नांदेड येथे नांदेड उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ. विठ्ठल मोरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील रसायनशास्त्र संकुलाचे संचालक प्रा.डॉ.भास्कर दवणे, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक नंदनजी नांगरे, महाराष्ट्र राज्य मुख्य संयोजक तक्रार निवारण समिती प्रोटानचे प्रा. डॉ. मोहन मिसाळ व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदरील पुरस्कार हा त्यांच्या आयुष्यातील ३३वा पुरस्कार आहे.
त्यांच्या या पुरस्कार निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड साहेब, संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य गंगाधर रावजी राठोड, मुखेड कंधार विधानसभा परिक्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड,संस्थेचे सदस्य तथा जि प सदस्य संतोष भाऊ राठोड, संस्थेचे सचिव गोवर्धनजी पवार,संस्थेचे सदस्य मुख्या. गोविंद पवार,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आप्तेष्ट,मित्र परिवार व विद्यार्थी विद्यार्थीनींनी केले आहे.