काळाच्या पुढे पाहणारे, बाबा.

काळाच्या पुढे पाहणारे, बाबा…  किशनराव बाबा आमलापुरे

     माझे वडील भाऊ वेगळे राहिले आणि मग नाही म्हणाले तरीही बाबा किशनराव बाबा आमलापुरे हादरले. कारण म्हणजे बाबा कारभारी होते आणि भाऊ काम करत होते. पण घरी म्हणून उरी आलेले दुख लपवून म्हणायचे आपल्या येथे काही दोन नंबरचा धंदा नाही. त्यामुळे नाटक तमाशात पैसा घालवू नको.म्हणजे सिनेमा पाहू नको म्हणायचे. त्याही पुढे भाऊ वेगळे राहिल्याने उत्पादनाचे झरे नगदी आटले होते. त्यामुळे ते म्हणायचे, आता फक्त साचलेले पाणी आहे. विचार करून खर्च कर. 

    शिवाय काँलेज झाल्यावर इकडे तिकडे बाजारात फिरण्यापेक्षा खोलीवर आराम कर म्हणायचे. जणू बाहेर जाऊन बाहेरचे वातावरण खराब करू नको आणि बाहेरचे दुषीत वातावरण घरी आणू नको.म्हणून आजच्या कोरोना व्हायरस या जागतिक महामारीच्या काळात त्यांच्या या विचारांनी परत एकदा माझ्या डोक्यात ठाण मांडले.बाबा तसं पाहिलं तर तुम्ही अवेळी गेलात. हे खरं आहे .पण दोन वर्षांपूर्वी आमचा साडुभाऊ गजानन आनेराये ,गतवर्षी आमचा वर्गमित्र सुनील तुळशीराम सोनकांबळे,हंगरगेकर,प.देगलूर, तर यावर्षी वर्गमित्र विजय कागणे हिब्बट ता.मुखेड जग सोडून गेला.दोन्ही मित्र फक्त पंचेचाळीसच्या आसपासचे.त्यामुळे तुम्ही अवेळी गेलात,असे म्हणायचे धाडस आता मात्र होत नाही. दोन्ही वर्गमित्रांना भावपुर्ण श्रद्धांजली.

कालच्या महिन्यात म्हणजे १३ जुलै  २० ला वर्गमित्र ज्ञानेश्वर पोतदारचे वडील खर्चले.या तुलनेत तुम्ही लवकर गेलात. पण माऊलींच्या वडिलांसारखे चलता फिरता,उठता बसता गेलात. त्यामुळे ते एका द्रष्टीने बरेच झाले .कारण

गझलकार सुरेश भट एका गझलेत म्हणतात,   

  सरणावर जळताना एवढेच कळले होते     

 मरणाने केली सुटका   

   जगन्याने छळले होते.

.दि.१५ जुलैला पुण्याहून गोविंद कंधारेचा फोन आला.म्हणाला १३ पासून २३ पर्यंत लाँकडाऊन आहे. मला वाटतं, काम नाही तर दाम नाही. आसी स्थिती असावी. पण माझी सुदैवाने नाही आहे.एक गोष्ट म्हणजे बाबा, योगायोगाने का असेना, पण या लाँकडाऊन मध्ये माझी काळजी घेणारे एक बंदुतूल्य व्यक्ती म्हणून एकनाथराव पलमटे आणि पीत्रतूल्य व्यक्ती म्हणून एन.डी.राठोड साहेब भेटले आहेत.गबाळे काकांनी पण बंधुचेच प्रेम दिले. त्यामुळे लाँकडाऊन सुकर झाला. विजू सावकार आणि सुनील सरनी लेकरं आहेत म्हणून खायला घेऊन दिले.याचकाळात वर्गमित्र डॉ कासिम बिच्चू यांनी माझ्या मोबाईलला ४०० रुपयेचा रिचार्ज मारला आणि मला अद्ययावत ठेवले.

तर गबाळे काकांनी सकारात्मक विचार दिले.शिवाय पलमटे काकांनी जेव्हा जेव्हा काम निघाले तेव्हा तेव्हा ०४ – ०५ वेळा मला माझ्या गावाकडे म्हणजे फुलवळला नेऊन आणले.विशेष म्हणजे मायीची भेट होत राहीली.प्रत्येक वेळी एक तास म्हणजे ०५- ०६ तास मायीसोबत थांबता आले.जणू प्रत्येक महिन्यास एक तास.     

  बाबा हयात असताना,बापरे बाप,डोक्याला ताप म्हणणारा मी, आज उठता बसता,हसावा,डसावा पण बाप असावा या मानसिकतेचा झालोंय.तुमच्या आठवणीत.

किशनराव बाबा आमलापुरे

प्रा.भगवान कि.आमलापुरे फुलवळ

मो.९६८९०३१३२८

द्वारा. शं.गु.महाविद्यालय धर्मापुरी.

ता.परळी. ( वै. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *