कंधार ;
कंधार म्हटले की आपल्या आठवते तो कंधारचा राष्ट्रकुटाचा इतिहास.राष्ट्रकुट घराणे हे कलाप्रति संवेदशील होते.त्या कलाविष्काराच्या पाऊलखुणा आजही अनेक उत्खननातून आपल्या सापडतात.या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ऐश्वर्य स॔पन्न कंधार नगरी राजकिय क्षेत्रात वयाची शंभरी पार करणारे जन्मशताब्दी दीर्घायुषीवीर,विद्रोही विचारवंत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या राजकिय कारर्किदीने अन् त्यांना मिळालेली भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या साथीने कंधार हा देशपातळीवर नावा रुपास आलेला डोंगरदर्यांनी वेढलेला तालुका होय.आजही कंधार नाव उच्चारताच अनेक पैलुंनी कंधार तालुका सुपरिचीत आहे.
या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कंधार नगरीत कंधार-मुखेड रोडवर चंद्रभागा नगरात जाधव हाॅस्पिटल हे रुग्नसेवेचा वसा घेतलेले एक रुग्नालय आहे.या होस्पिटलचे वैद्यराज डाॅ.भगवानराव जाधव सुगाव सुमठाणकर यांच्या अधिश्वरी डाॅ.सौ.अर्चना भगवानराव जाधव या स्त्री रोगतज्ञ म्हणुन सेवा देतात.आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्याचा आढावा घ्यावा वाटला. या अनुशंगाने त्यांच्या जीवनाचा अल्प मागोवा घेण्याचा अनुप्रयास करत आहे.
डाॅ.भगवानाची अर्चना तुम्ही,
संसारवेलीवर अन्वयी फुलली!
वाढदिवसाच्या सुमंगल दिनी,
यशवंत निवासस्थानी खुलली!
रुग्न सेवेचा वसा हाती घेतल्याने,
पांचाळपुर कंधार नगरी आनंदली!
अभिष्टचिंतनाच्या वर्षावाने आज,
लक्ष-लक्ष सौभाग्य सदिच्छांनी,
भगवान भार्याची ओटी भरली!
या शब्द काव्यातून वाढदिवसाच्या सौभाग्य सदिच्छा देत त्यांचा कार्याचा मागोवा घेत आहे.
डाॅ.अर्चना पाटील या लातूर तेथील पाटील घरंदाज परिवारितील कन्यारत्न.त्यांचे बारावी शिक्षण पर्यंतचे शिक्षण लातूरच्या राजर्षि शाहू महाविद्यालयातून पुर्ण झाले.त्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेत गुणवंत झाल्यामुळे अकोला येथुन बी.ए.एम.एस.ची शैक्षणिक पात्रता घेवून वैद्यकिय पदवी मिळवली.त्यांच्या पाटील घराण्यात जवळपास 17 नातेवाईक पदवित्तर शिक्षण घेतलेले आहेत.भाऊ शिकागो येथे,मामी प्लास्टीक सर्जन,मामा अस्थीरोग तज्ञ,मावशी स्त्री रोग तज्ञ,एक भाऊ अभियंता तर भगीनी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका,आई सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापिका आणि वडील आदर्श व्यवसाय तज्ञ.हा सुशिक्षित पाटील परिवाराच्या संस्कारात लहानाच्या मोठ्या झाल्या.
त्यांचा विवाह सामान्य जाधव कुटूंबाच्या डाॅ.भगवान जाधव यांच्याशी झाला.आज घडीला त्यांचे हाॅस्पिटल कंधार शहरात आहे.ज्या सौभावतीस दोन मुलीच आहेत अशा रुग्नांस ते मोफत तपासत असतात.वंध्यत्व रोग्यावर यशस्वी उपचार करुन त्यांना त्यात यश आले आहे.कंधार-लोहा पंचक्रोशीत यांच्या ज्ञानाचा अनेक रोग्यांना फायदाच होतो आहे.सर्वात प्रथम डाॅ.सौ.अर्चना व डाॅ.भगवानराव हे वैद्यकिय क्षेत्रात करणारे दाम्पत्य अवयव दान करुन कंधार व लोहा लालुक्यात प्रथम मान मिळविला आहे.त्याचा समाजिक दृष्टीकोन अनेक उपक्रमातून दिसुन येतो.त्यांच्या कु अन्वयी मुलींच्या आज पर्यतच्या वाढदिवसास गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,गणवेश,शैक्षणिक जीवनात उपयोगी पडणारे साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
अशा समाजप्रिय नारीशक्तीस वाढदिवसाच्या मंगल दिनी सौभाग्य सदिच्छा देवून लेखनीस विराम देत आहे.
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
9860809931