भारतीय संविधान दिन

           भारत माझा देश आहे हे म्हणताना सर्वांनाच गर्व , अभिमान वाटतो . जगातील प्राचीन देशापैकी भारत हा एक देश आहे . भारतीय संस्कृतीही प्राचीन संस्कृती पैकी एक आहे . भारतीय संस्कृती सर्व समावेशक आहे . येथे हजारो आक्रमण कर्ते आले . काही काळ राज्य ही केले व काळाच्या ओघात नामशेषही झाले . भारत हा देश आपली संस्कृती , परंपरा , बंधूभाव ,अहिंसा ' समता , एकता जपत जगाचा दिस्तंभ म्हणून आज जगात ताठ मानेने उभा आहे . 



राष्ट्र म्हणजे काय ? राष्ट्र कोणास म्हणतात ? राष्ट्र म्हणजे विशिष्ट प्रदेशात राहणारे लोक जे बाह्य शक्तीपासून पूर्णतः मुक्त असतात . त्यांची स्वतःची शासन प्रणाली असते . ते स्वतःचे कायदे तयार करतात . त्यास आपण राष्ट्र असे म्हणतो .१९४७ पर्यंत आपला देश होता ; पण आपण राष्ट्र नव्हतो . आपण इंग्रजाच्या गुलामगिरीत होतो . १५ ऑगस्ट १९४७ ला आपणास स्वातंत्र मिळाले . यात हजारो भारतीयांनी बलिदान दिले . देश स्वातंत्र्य झाला . त्यापूर्वी देश कसा चालवावा ?प्रशासन कसं असावं ? शासन प्रकार कोणतं असावं ? यासाठी देशातील नेत्यांनी , विद्वानांनी जगातील विविध शासन पद्धतीचा अभ्यास केला . अमेरिका , इंग्लंड ,फ्रान्स , स्वित्झर्लंडच्या व इतर देशांच्या शासन प्रणालीचा अभ्यास करून आपल्या देशासाठी ही राज्य घटना लिहिण्याचे ठरविले . त्यासाठी विविध समित्या अस्तित्वात आणल्या .








            भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. स्वातंत्र ,समता , बंधुता , न्याय ही मुल्य आपल्या घटनेत समाविष्ठीत आहेत . आपल्या भारतीय मुळ घटनेत एक प्रस्ताविका आहे. तीनशे  पच्च्यानव (३९५ ) कलमे ,आठ (८ ) अनुसुची होत्या व पंचविस (२५ )भाग होते . आजचा विचार केला तर भारतीय घटनेत एक प्रस्ताविका , चारशे आठेचाळीस ( ४४८)कलमे आहेत . बारा (१२) अनुसुची व पंचविस ( २५ ) भाग आहेत . पाच परिशिष्टे आहेत . आतापर्यंत एकशे एक ( १०१ ) वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे .

                ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीची स्थापना करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा हे या समितिचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. पुढे दोनच दिवसांनी म्हणजे ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ . राजेंद्र प्रसाद हे या समितीचे अध्यक्ष झाले .



     पाकिस्तानच्या फाळंणीनंतर भारतीय राज्य घटना समितीत दोनशे ब्यानव (२९२ )सदस्य संख्या होती . घटना समितीच्या एकूण अकरा (११) बैठका झाल्या . या बैठकीसाठी एकशे पासष्ट दिवस (१६५) खर्च झाले . घटना लवकर तयार व्हावी यासाठी एकोनवीस ( १९ ) उपसमित्यांची निर्मिती केली होती. त्यात एक मसुदा समिती होती . या महत्वाच्या समितीचे अध्यक्ष होते डॉ . बाबासाहेब आंबेडकर . या मसुदा समितीच्या एकूण चौरेचाळीस ( ४४) बैठका (सभा ) झाल्या . संविधान समितीने संविधान तयार करण्यासाठी दोन ( २) वर्षे ११ महिने १८ दिवस घेतले .

              २९ ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीने  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेत्तृत्वाखाली आपल्या कामकाजास सुरवात केली . या समितीत पंडित नेहरू , अल्लादी कृष्णास्वामी अय्यर , एन गोपाल स्वामी अय्यंगार , के एम मुन्शी , सय्यद मोहमद सादुल्लाह , बि एल मित्तर , डी.पी खैतान अशा दिग्गज नेत्यांचा भरणा समितीत होता . भारतीय संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्णपणे  तयार झाले व ते संविधान "संविधान समितीस "मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने महामनाव डॉ बाबासाहेब (भिमराव ) आंबेडकर यांनी सूपूर्द केले .




                  संविधानाच्या पानांवरील हस्तकला आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांती निकेतन मधील कलाकारांनी केली तर प्रस्ताविकाचे पान व इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनविले होते . संविधानाचे हस्तलिखित बिहारी नारायन रायजादा यांनी केले . संविधान हस्तलिखीत (कॅलीग्राफी ) लिहिण्यासाठी त्यांना सहा (६) महिने लागले . २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना आपल्या देशाने स्विकारली व भारत देश हा एक प्रजासत्ताक देश म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आला .




             पूर्वी कधी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करत नव्हते . शासन स्तरावर केले असतील तर संविधान दिन म्हणून त्याला नाव दिलेले नव्हते . तर "संविधान कानून (कायदा)दिन " या नावाने साजरा होत होता .मग संविधान दिन म्हणून कधी पासून साजरा करण्याचे सुरु झाले? हे सुरु झाले २६ नोव्हेंबर २०१५ पासून ;पण यापूर्वी कित्येक दशकापासून या भारत देशातील आंबेडकरवादी जनता , बौद्धजन हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळत होते .  पाळत आहेत व पाळत राहाणार आहेत . २६ नोव्हेंबर २०१५ या दिवसापासून केंद्र शासनाने संपूर्ण भारतभर हा दिवस भारतीय "संविधान दिन "म्हणून पाळण्यास सुरवात केली . कारण होतं महामानवांची १२५ जयंती . या मुळे महामनावाचे कार्य , विचार सामन्य जनतेपर्यंत पोहचावे राज्यघटनेची ओळख व्हावी राज्य घटना प्रत्येक घरात पोहचावी हा उदेश आहे.



राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली ” काळेश्वरनगर, विष्णुपूरी,

नांदेड-६. ९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *