फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
१९९२ पासून ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्याची संयुक्त राष्ट्र संघाने सुरुवात केली , त्यानुसार दरवर्षी सर्वत्र हा जागतिक अपंग दिन साजरा केला जातो , त्याच अनुषंगाने फुलवळ येथेही तो साजरा करण्यात आला आणि येथील उपस्थित सर्व दिव्यांगांचा ग्रामपंचायत कार्यालय फुलवळ च्या वतीने गौरव करण्यात आला.
सरपंच विमलबाई नागनाथ मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव तथा ग्रामविकास अधिकारी अशोक मंगनाळे तसेच केंद्र प्रमुख तथा मु.अ. बालाजी केंद्रे यांच्या उपस्थितीत आता. ३ डिसेंबर रोजी फुलवळ ग्राम पंचायत च्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत गाव विकास आराखडा २०२२ - २०२३ साठी उपस्थित ग्रामस्थांच्या समक्ष चर्चासत्र ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून गाव विकासाचा आराखडा निश्चित करण्यात आला.
याचवेळी गावातील दिव्यांगांचा गौरव ही करण्यात आला. यावेळी उपसरपंच तुळशीदास रासवते , ग्राम पंचायत सदस्य चंदबस मंगनाळे , बालाजी देवकांबळे , प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , विमलबाई देवकांबळे , शांताबाई जेलेवाड , रहीम शेख सह सर्व अंगणवाडी कार्यकर्ती , मदतनीस , पत्रकार , ग्राम पंचायत चे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे यांनीही सागर मल्टिसेर्व्हिसेस येथे छोटेखाणी कार्यक्रम घेवुन उपस्थित सर्व दिव्यांगांचा शाल , पुष्पहार देऊन गौरव केला व मिठाई चे वाटप केले .
यावेळी योगायोग कंधार पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सुरेश मांजरमकर , कदम यांचीही उपस्थिती लाभली. यावेळी सर्व दिव्यांगांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे अपंगांच्या निधीबद्दल मागणी केली असता त्यांनी लवकरच आम्ही त्यासंदर्भात कार्यवाही करू आणि ग्राम पंचायत ला तसे कळवू असे सांगून आमचा विभाग सदैव दिव्यांगांच्या मदतीसाठी तत्पर असून तुमच्यासाठी सकारात्मक विचार ठेवून नक्कीच मदतीचा हात देऊ असे आश्वासन ही गटविकास अधिकारी यांनी दिले.