फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली ता. ३१ डिसेंबर रोजी पटणे सभागृह फुलवळ येथे आयोजित प्रशासन आपल्या गावी या अभियानादरम्यान महसुल , ग्रामविकास , कृषी , आरोग्य , वनविभाग , मोजणी , सामाजिक वनिकरण , महीला व बालविकास , महीला अर्थिकविकास महामंडळ , सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , पशुधन विकास , विज वितरण , महाराष्ट्र ग्रामिण जीवन ज्योति अभियान , पोलिस विभाग , सा.बा.विभाग असे जवळपास पंधरा विभागातील योजनांची सखोल माहीती ग्रामस्थांना देण्यासाठी त्या त्या विभागाचे प्रमुख सदर कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आपापल्या विभागातील विविध योजनांची माहिती देत जनतेच्या अडीअडचणी काही असतील त्या सोडवण्यासाठी प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम राबविला गेला , प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपापल्या योजनांची माहिती दिली आणि जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या व कांही प्रकरणे निकाली काढण्याच्या हेतूने लाभार्थ्यांनी त्या त्या कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज करावे त्यावरून आपले प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल असेही उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक , तहसीलदार संतोष कामठेकर , पर्यवेक्षिका सी जी पोले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना बेबीकीट चे वाटप करण्यात आले , तर सातबारा , उत्पन्नाचे प्रमाणपत्र , जातीचे प्रमाणपत्र , असे अनेक प्रकारचे प्रमाणपत्राचे वाटप उपस्थित अधिकारी व त्या त्या विभागाचे प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थीत असलेल्या अधिकारी व विभागाप्रमुख यांचा ग्रा.प.च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने मंडळचे मंडळ अधिकारी एस एम पटणे , ग्रामविकास अधिकारी ए.एस मंगनाळे , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश रामपुरे , तलाठी श्रीदेवी उत्सुर्गे , सर्व अंगणवाडी सेविका , फुलवळ मंडळातील त्या त्या विभागाचे कर्मचारी , सरपंच , उपसरपंच , ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.