नांदेड,
सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू व्हावी तसेच शिक्षकांच्या इतर प्रलंबीत मागण्याकड शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.
२००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी.सातव्या वेतन आयोगा तील त्रुटी दूर करून खंड दोन प्रकाशित करण्यात यावा, नवीन शैक्षणिक धोरणातीला शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळाव्यात, समानकाम समान वेतन या न्यायला धरून शिक्षण सेवक योजना रद्द करणे, सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतश्रेणी लागू करणे,
एम.एस.सी.आयटी मुदत वाढविणे, राज्याच्या शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे भरणे, केंद्रप्रमुखांची सर्व रिक्तपदे शिक्षकांतून पदोन्नतीने भरणे, नांदेड जिल्हा परिषदेतील जिपी एफस्लिप मधील सावळा गोंधळ दूर करणे, १२ वर्ष सेवा पूर्ण सर्वाचे चटोपाध्याय वेतश्रेणीचे आदेश काढणे, वर्षानुवर्ष रखडलेली वरिष्ठ वेतश्रेणी सुरू करणे, सहाव्या वेतनआयोगातील हप्ते जमा करणे,वस्ती शाळा शिक्षकांना मुळनियुक्ती पासून सेवा जेष्ठतेचा लाभ मिळावा, रखडलेल्या अंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या व याव्यात आदी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज प्रदेशाध्यक्ष देविदासराव बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यसंघ पदाधिकारी दिलीपराव देवकांबळे,राज्य संघटक चंद्रकांत मेकाले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरासह नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापूढ आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपाईंचे जिल्हाध्यक्ष गौतम काळे यांनी धरणे आंदोलनास भेट देवून आपला पाठींबा जाहीर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक पाटील,सरचिटणीस प्रल्हाद राठोड,
कार्याध्यक्ष सुधाकर थडके,तूळशिराम केंद्रे,बी.डी.देशमुख, तुका पाटील, संतोष कदम, विनायक चव्हण,गुलचंद दासरे,गंगाधर नंदेवाड, नारायण पेरके, निरंजन भारती, मुर्तुज शेख,मारोती गायकवाड,मंगल सोनकांबळे, मारोती घाटे, संजय अकोले,शिवाजी शिंदे,मिथुन मंडलेवार, डी.डी.जामगडे,दतात्रय धात्रक, प्रभू सावंत, गुणवंत सोळंके,भगवान चव्हाण, पांडूरंग पाटील,व्यंकटराव कल्याणकर,
दिलीप नवगीरे,वसंत कदम, नरसिंग जाधव,यवंत देशमुख, रामचंद्र बसवदे,संजय आकोले,गंगाधर बोमनाळे, लक्षमणा करेवाड, पंढरी भालेराव, व्यंकटी लामदाडे, प्रकाश वडवळे यांचेसह बहुसंख्य शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.