कोरोनाने जगायला शिकवले

कोरोनाने जगायला शिकवले..

     तसे पाहिले तर कोरोना हे नैसर्गिक संकट नाही,कृत्रिम बाॅब प्रमाणे चिनने हा विषाणू सर्वत्र पसरवला.विस्तारवादाचे प्रभावी हत्यार म्हणून या विषाणूचा प्रयोग केला.कोरोनाने अख्खे जनजीवन विस्कळीत केले.पण,यातून मानवाला बरच काही शिकायला मीळाल.

अजूनही त्यापासून बरच काही शिकत आहोत.अत्यंत कठीण परिस्थितीत तग धरायला कोरोनानेच शिकवले.खरचं…आपल्या गरजा कीती कमी असतात? हा नवा धडा दिला.पण मानवप्राणी  अधिक हव्यासापोटी विनाकरण दिवस रात्र धावपळ करतो,आहे त्यात समाधान मानत नाही.

पैशापेक्षा जीवन अनमोल आहे हा नवा मंत्र कोरोना पासून मीळाला.तसेच कोरोनाचा संसर्ग झाल्यावर आपले कोण?आणि परके कोण? याची प्रचिती आली.कोरोनामूळे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की,निसर्गाला मानवाची गरज नाही,पण…मानवाला निसर्गाची अत्यंत गरज आहे.

भौतिक आणि चंगळवादी सुख निसर्गापुढे खुपच शिल्लक,क्षणभंगुर आहे.आयुष्याचे नवे नवे पदर कोरोनाने उलगडून दाखवले.सुख म्हणजे नक्की काय?दोनवेळची पोटभर भाकर,राहायला झोपडी,अन…अंग झाकायला पुरेसा कपडा…बस्स आपल्या ह्या तीनच गरजा असतात जगण्यासाठी.

कोरोनानं श्रीमंत,गरीब हा भेदभाव संपवला.मला कुणाचीच गरज नाही?माझ्याकडे भरपूर पैसा आहे.मी आणि माझे कुंटूब म्हणत गावापासून दुरावलेल्या लोकांना कोरोनाने झटकन जमीनीवर आपटले,गावाकडच्या कूडाच्या झोपडीतही  आपल्या वृध्द आई-वडिलांसमवेत आयुष्य सुखान व्यतित करु शकतो ही भावना कोरोनाने जागृत केली.

मनुष्य जीवनामध्ये समाज आणि कुंटूब कीती महत्वपूर्ण आहेत याचा धडा कोरोनाने शिकवला.जगण्याची नवी प्रेरणा दिली.माणसातील पद,पैसा,प्रतिष्ठा,गर्व,मी पणा,स्वार्थी वृत्ती कोरोनाने धुळीत मीळवत फक्त माणूस म्हणून जगायला भाग पाडले.   

     आपल्या दैनदिन जीवनामध्ये पैशाला कवडीमोल समजले जाई पार्टी,हाॅटेलमध्ये जेवणे,लग्नसंभारंभात पाण्यासारखा पैसा खर्च करणे,ही आपली फॅशन झाली होती.मात्र कोरोनामूळे लाॅकडाऊन झाल्यानंतर अनेकजण आर्थिक मंदित आले.पैशाचै स्त्रोत बंद झाले.

तेव्हा पैशाची खरी किंमत समजली.पोटावर हात असणारे मजूर,कामगार ऊपाशी मरु नये म्हणून अनेकजण सढळ हाताने मदत करायला समोर आले.सर्व कारखाने बंद झाल्यावर गावाकडच्या ओढीने हजारो मैलाचा प्रवास लोकांनी पायी केला

korona

उन्हा,तानात काहींचा यात मृत्यू झाला,काहींना रस्त्यातच कोरोनाची बाधा झाली,एवढ लांबून चालून आल्यावर त्यांना रक्ताच्या नात्यांनी घराची दार बंद केली गेली,कारण,प्रत्येकालाच आपला जीव प्यारा वाटायला लागला,कोरोना मूळे जगण्याच महत्व समजल.नात्यात मात्र कोरोनाने खुप दूरावा आणला.कोरोनाने एकाकी जगायला भाग पाडले,शांतता,सयंम,आणि दान करायला,स्वच्छ राहायला शिकवले.

आपल्या भारतात स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त गावे हे संत गाडगे बाबा यांचे स्वप्न होते.स्वच्छ अभियानाअंतर्गत या योजना शासनाने काटेकोर पणे पाळल्या,पण जे काम सत्तरवर्षात कोणत्याही सरकारला करुन दाखवता आले  नाही ते काम कोरोनाने काही दिवसात करुन दाखवले. 

         मोजक्या नातलगांना आमंत्रीत करुन देखिल लग्न होऊ शकत,वायफळ खर्च टाळून तो खर्च संसाराला उपयोगी होऊ शकतो ही भावना केवळ कोरोनामूळे जागृत झाली.लाॅकडाऊनचा फायदा घेत काही पालकांनी सर्रास बालविवाह उरकून घेतले..

.याचे दूष्पपरिणाम कालांतराने जाणवतीलच.कोरोनामूळेच बळीराजाच जगाचा पोंशिदा आहे हे पुन्हा समोर आले,बळीराजा कोरोनातही भाजीपाला,दुध न चूकता शहरीभागात पोहचवत होता,तो थांबला असता तर आज अख्खे जग थांबले असते,कोरोनामुळेच ग्रामीण जीवन आणि शेतीचे महत्व पटले.

शेतीच्या माध्यमातून धान्य पीकवून जगू शकतो याची जाणीवही झाली.या जगात प्रत्येक गोष्टीला एक चांगली आणि एक वाईट बाजू असते,कोरोनाचे देखिल असेच आहे.कोरोनाने आपले आप्तस्वकीय  हिरावले.तसेच अनेक वाईट अनुभव दिले,रक्ताच्या नात्यांना शेवटचा निरोप देखिल या कोरोनान घेऊ दिला नाही.

कोरोनाने शेतक-याचा कणा वाकला.याच कोरोनाने माणसाला जन्म आणि मरण यातल अंतर दाखवल.कोरोनाने  नात्यातील जगण्याचा रसच शोषून घेतला.कोरोनात रक्ताच्या नात्यान झिडकारल पण,कर्तव्याच्या नात्यांनी माणुसकी जपली.डाॅक्टर,पोलिस,नर्स,स्वच्छताकामगार यांनी आपले प्राण पणाला लावून कोरोनाशी लढा पुकारला.

अख्ख जग स्वता;ला घरात बंदिस्त करून असतांना हे यौध्दे मात्र जिवाची पर्वा न करता अहोरात्र रस्त्यावर ऊभे राहून आजही लढत आहेत.या कोरोनाच्या संकटसमयी एक गोष्ट मात्र लक्षात आली ती म्हणजे…कोणताही देव,बाबा,बूवा या संकटसमयी प्रत्यक्षात वाचवायला धावूनआला नाही

.निसर्ग हाच खरा धर्म,आणि निसर्ग हाच देव हीच शिकवण कोरोनान दिली.रोग प्रतिकारक शक्ती हीच आपली खरी ताकत आहे. त्या साठी आरोग्यधन मीळवणे महत्वाचे.पोलिस आणि डाॅक्टर हेच आपल्यासाठी देव आहेत.पोलिस म्हटल की कठोर मनाची तापट व्यक्ती,अशी जवळपास लोकांची समजूतच झाली होती.

पण,पोलिसांच कार्य पाहातांना त्यांच्या विषयी ऊर अभिमानाने भरुन येतो.कारण…कोव्हीड-१९ विरुध्दच्या लढ्यात महाराष्ट्र पोलीस लढव्वये शिलेदार ठरले आहेत. ज्या व्यक्ती अंधश्रध्दा मानतात त्यांचे डोळे मात्र या काळात ऊघडले गेले.अंगारे,धूपारे यांचा कोरोनावर काहीही प्रभाव पडला नाही.गंभीर आजार असो अथवा आपली आर्थव्यस्था या एकावर प्रभाव पडल्यास त्याचे परिणाम दूस-यांनाही भोगावे लागतात.कोरोनाच्या या संकटसमयी हे दिसून आले.

मानवतेने जगण्याचा आणि निसर्गावर भरभरुन प्रेम करण्याचा मंत्र कोरोनाने दिला.कोरोनामूळ निसर्गचक्र सूधारल,वन्यप्राणी अगदि मुक्तपणे रस्त्यावर फिरतांना पाहिले ते केवळ कोरोनामूळे

,कोरोनान नात्याची विण घट्ट करत संवाद साधायला शिकवल,कोरोनामूळे काहींचे संसार उध्वस्थ झाले,महिलांवरच्या कौटुंबिक हिंचारात वाढ झाली.त्यावर प्रतिकार करण्याच सामर्थ्यही या कोरोनाकाळात महिलांनी आपल्या मनगटात एकवटवल.कोरोनान संघर्षाचा धडा दिला.

भविष्यात येणा-या मोठ्या संकटावर मात करण्याची मानसिकताही कोरोनान दिली.आज आपण सर्वजण कोरोनाशी एकसंगठीतपणे लढत आहोत.तरी,कोरोनाने हजारचा आकडा पार केला,वरचेवर रुग्णसंख्या वाढतेय.

कोरोनाला न घाबरता आपल्याला त्याला नांदेडशहराबाहेर हद्दपार करायचे आहे…कोरोना तू आम्हाला बरच काहि शिकवलस जे आम्ही कधीच विसरणार नाही.यावेळी मला आयुष्यमान खुराणाच्या इस्टाग्रामवरच्या कवितेच्या चार ओळी आठवल्या ज्या वास्तवाची जाणीव करुन देतात…


आज हम डरे हुये हैजिवीत है पर मरे हुये है

रुपाली वागरे/वैद्यनांदेड९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *