कंधार ; ता. प्रतिनिधी
कंधार शहर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराचे वैभव व इतिहास यांचा आभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते . शहराच्या बाहेरून दोन्ही महामार्ग गेले आहेत त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून बाहेऊन येणाऱ्या पर्यंटकांची व कंधार शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या बाबीचा विचार करून
कंधार शहर हे सध्य परिस्थितीत कुठल्याही राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग याने जोडल्या गेलेला नाही. यामुळे आज परिस्थितीत कंधार शहराची अवस्था अडगळीत बाजूला पडल्या सारखी झालेली आहे. या करीता कंधार शहरास राष्ट्रीय महामार्ग क्रं.५० पांगरा येथून कंधार-लोहा रोडवरील घोडज फाटा येथे लिंक रोडने जोडल्यास कंधार शहराचा विकास झपाटयाने होईल व तसेच कंधार पानभोसी-आंबेसांगवी हा रस्ता नांदेडला जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग असून सद्यपरिस्थितीत हया रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. सदरील रस्त्यावर हया भागातील जवळपास २० गावे येतात.
कंधार-पानभोसी-आंबेसांगवी या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुती करण करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे माजी आ.ईश्वरराव भोसीकर यांची मागणीची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. नामदार अशोकराव चव्हाण यांनी दखल घेवून कामाची बजेट मध्ये तरतूद करण्यासाठी पाहणी करण्याचे संबधित विभागाला आदेश दिले आहेत.