विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सूरू करा -साईनाथ कोळगिरे

कंधार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरसकट बंद केलेल्या शाळा तातडीने चालू कराव्यात अशी आग्रही मागणी उपविभागीय अधिकारी याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे यानी निवेदनाद्वारे केली आहे.

उपविभागिय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध घातले आहेत.या निर्बंधामध्ये सरसकट शाळा बंद केल्या आहेत.तसेच इयत्ता दहावी आणी बारावी चे वर्ग सूरू करण्यास परवानगी दिली आहे.

वास्तवीक ज्या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण नाहीत तीथे शाळा चालू करण्यास कांही गैर नाही.विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा सूरू ठेवाव्यात.ऑनलाईन शाळा सूरू ठेवन्यात मोठी अडचण असून असंख्य पालकांकडे मोबाईल नाही,कूठे नेटवर्कची समस्या आहे.

चित्रपट गृह,नाट्यगृह,धार्मिक जागा,माॅल्स,हाॅटेल या सगळ्यांना ५० टक्के उपस्थितीत परवानगी असताना शाळा सरसकट बंद का करण्यात येत आहेत…?ऑनलाईन शिक्षण सर्वांना सोयीचे नसून प्रत्येक्ष वर्गात बसून शिक्षण घेणे हाच शिक्षणाचा योग्य मार्ग आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन,वाचन तसेच गणित विज्ञान या सारख्या विषयाच्या आकलनात उणीवा रहाणार आहेत.करिता एकदिवसाआड शाळा भरविने,शाळेची वेळ कमी करणे,विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट करून शिक्षण देणे,ग्रामीण भागातील शाळा सूरू ठेवने आदी पर्यायाचा शासनाने विचार करून तातडीने शाळा चालू करण्यात यावे अशी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कंधार चे साईनाथ कोळगिरे यानी लेखी निवेद्दना द्वारे केली यावेळी भाजपा उपाध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे, सरचिटणीस बालाजी तोरणे, चिटणीस ज्ञानेश्वर श्रीमंगले , सोशल मीडिया प्रमुख दिपक गोरे, प्रसिद्धी प्रमुख ,कांतराव आगलावे भाजपा चिटणीस गोविंदराव वाकोरे , चिटणीस, हनमंत गिते, सदस्य, प्रदिप मंगनाळे,आदी युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *