काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा कंधार भाजप च्या वतीने पुतळा जाळून केला निषेध

कंधार:- प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांना मारण्याची धमकी देणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने माननीय तहसीलदार यांना दि १९ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे करून नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिनांक १६ जानेवारी रोजी साकोली येथे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं की मी मोदींना मारू शकतो व शिवीगाळही करू शकतो असे घरणास्पद वक्तव्य करून देशाच्या पंतप्रधान ना मारण्याची धमकी देऊन अपमान केला असे अपमानास्पद वक्तव्य केले त्यामुळे सबंध देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे बेताल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले वर गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने माननीय तहसीलदार ,कंधार व पोलीस निरीक्षक कंधार यांना निवेदनाद्वारे केली आहे तसेस भजपा कंधार च्या वतीने नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन महाराणा प्रताप चौक येथे करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेचे दहन केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, युवा मोर्चा चे जिल्ह्याचे उपाध्यक्ष निलेश गौर,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे, चेतन केंद्रे ,शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,कैलास नवघरे, मधुकर कांबळे ,श्रीराम जाधव ,शंकरराव जाधव, बालाजी तोरणे, राष्ट्रीय परिषद सदस्य तुकाराम वारकड, सतीश कांबळे, माधव वाकोरे, उमेश शिंदे ,दत्ता डांगे, दीपक गोरे,अड सागर डोंगरजकर, कांतराम आगलावे ,माणिकराव बोरकर, दत्तात्रय किंनवाड, धोंडीराम गडमवाड,मधुकर कांबळे,परमेश्वर कटकेमोड, प्रदीप मंगनाळे,गजानन कल्याणकर,यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *