स्त्रीमुखेड – देशाचा इतिहास हा विसंगत पद्धतीने लिहिला आहे. पूर्वी आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती होती. त्या काळात प्रचंड विकास झाला तदनंतर देशावर अनेक आक्रमणे झाली. सन्मान हा जगण्याचा विषय झाला पाहिजे – प्रा.डॉ. मारुती कसाब
मुखेड – देशाचा इतिहास हा विसंगत पद्धतीने लिहिला आहे. पूर्वी आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती होती. त्या काळात प्रचंड विकास झाला तदनंतर देशावर अनेक आक्रमणे झाली.
आक्रमणे झाली. नंतर मनुस्मृती आली आणि स्रियांवर नानाविध प्रकारचे बंधने लादले जाऊ लागले.शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. सीता भूमीतून आली याचा अर्थ ती भूमिकन्या होती म्हणजेच या देशातील ती मूळ निवासी होती असा अर्थ आपण घेतला पाहिजे.
आपण रामायण व महाभारत स्त्रीयांमुळे घडले असे म्हणून स्त्रियां बाबतीत नकारात्मकता पसरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो हे चुकीचे आहे.संतांनी समाज परिवर्तन घडवले. महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना अनुभव मंडपात स्थान दिले. तदनंतर महानुभाव पंथातही चक्रधरांनी स्त्रियांना सन्मानाचे स्थान दिले.त्यामुळेच महदंबा ही मराठीतील पहिली कवयित्री होऊ शकली. वारकरी संप्रदायाच्या मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा आदी संत कवयित्रींनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. सध्या भाषेच्या माध्यमातूनही भेदभाव जोपासला जातो. आपल्या मराठी भाषेत राष्ट्रपती, सभापती, न्यायमूर्ती अशा पुरुष वाचक शब्दांना पर्यायी शब्द नाहीत. सवत, सती, विधवा याला विरुद्धार्थी शब्द नाहीत. वर, वधू, कन्यादान या शब्दांचे अर्थही आपण समजून घेतला पाहीजे. ज्यांनी-ज्यांनी शब्दांचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांना या व्यवस्थेने संपविण्याचे काम केले आहे.
समतेची मागणी करणारी चळवळ संपत चालली आहे. स्त्री सन्मान हा बोलण्याचा नाही तर जगण्याचा विषय आहे असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथील मराठी विभागात कार्यरत प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. मारुती कसाब यांनी ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर, ता. मुखेड जि.नांदेड येथे समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार प्रसंगी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की, अत्यंत ज्वलंत व महत्त्वाच्या विषयावर चर्चा या निमित्ताने घडली त्याबद्दल आनंद वाटला .अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने वक्त्याने हा विषय मांडला आहे. आमचे संस्थाध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड व संस्थापक सचिव कै.आ.गोविंदराव राठोड यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवातीपासूनच महत्त्व दिले आहे. आमच्या सहकार्यांमध्ये बरेच प्राध्यापक हे दोन मुलींवर आनंदी जीवन जगत आहेत. त्यांनी मुलाचा आग्रह केला नाही. कृतीयुक्त जीवन जगणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. गंगाधर मठपती यांनी करून महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली व कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
सूत्रसंचलन माजी प्राचार्य तथा प्रसिद्ध वक्ते डॉ.रामकृष्ण बदने यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. शंकरय्या कळ्ळीमठ यांनी मानले.पाहुण्यांचा परीचय समाजशास्त्र विभागात कार्यरत प्रा.डॉ.सरोज गायकवाड यांनी करून दिला. कार्यक्रमाचे तंत्र सहाय्य प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. महेश पेंटेवार यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच राज्यातील अन्य महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.