कंधार(प्रतिनिधी)
मकरसंक्रांत म्हटलं कि,सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण आपआपसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तिळगुळ व वाण देवून मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो.याच मकर संक्रांतीला कष्टकरी गरीब महिलांचाही सन्मान झाला पाहिजे,म्हणून बहाद्दरपूरा येथे मकर संक्रातनिमित्त ऊसातोड कामगार महिलांसोबत हळदीकुंकू लावून शंभूराजे इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा प्रा.सौ.मनीषाताई पुरुषोत्तम धोंडगे व सौ.जयक्रांतिताई गवते यांनी मकरसंक्रांत सोहळा पार पाडला.
परिसरातील ग्रामिण भागातील गोरगरीब,कष्टकरी महिला आपल्या कुटुंबासोबत रानोमाळ भटकंती करत उघड्यावर राहणारी हि बाया पोरं ऊसतोड करणारी कुटुंब आपला संसार चालवत असतात.या समाजातील कुटुंबात या धोंडगे परिवाराने गोडवा निर्माण केला. समाजातील स्त्रीसाठी हा सण विशेष महत्वाचा असतो.कारण सौभाग्यचं वाण एकमेकींना दिलं जातं.या गरीब कष्टकरी महिलांच्या झोपडीत जाऊन वाण देऊन त्यांचा सन्मान केला.या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी प्रा.सौ.मनीषाताई धोंडगे यांनी कष्टकरी कामगार यांच्या कामाच्या झोपडीत जाऊन मकरसंक्रांत हा सण साजरा करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.