कंधार –
कंधार – प्रति महिन्यात महिन्याच्या सुरुवातीला सेवानिवृत्ती वेतन धारकाच्या खात्यात जमा होत होते पण केवळ कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे निवृत्तीवेतन धारकास ते १५-२० तारखेस अदा होत आहे त्यामुळे औषधोपचारास दिरंगाई होत आहे. तसेच कुंठूबाचा रहाटगाडा चालवताना नाकेनऊ येतच आहेत. यामुळे प्रत्येक महिन्याला एक दोन तारखेला निवृत्तीवेतन अदा करण्यात यावे अशी मागणी करत नांदेड जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन नांदेड तालुका कंधार शाखेच्या वतीने पंचायत समितीच्या समोर एक दिवशी उपोषण करण्यात आले.
आम्हचे वय झाले असुन आम्हाला व आमच्या पत्निला शुगर,बिपी,अॅटक यासारखे अनेक दुर्गम आजार जडले आहेत. प्रत्येक महिन्याला आम्हाला हजारो रूपयांची औषधी घ्यावी लागते.बर्याच जणांचे मुले शिक्षण घेत असल्याने व काहीजणांना पाल्य पोसत नसल्याने आमच्या सर्व गरजा स्वतःच पुरवाव्या लागतात.बाजारपेठेत वयोमानानुसार उधारी पण जेमतेम देतात.
यामुळे आमचे सर्व काही निवृतीवेतनावर आवलंबून आहे. यापूर्वी दर महिन्याला एक दोन तारखेला निवृत्तिवेतन बँक खात्यात नियमीत जमा होत होते. पण गत वर्षापासून केवळ कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे सदर वेतन पंधरा विस तारखेला खात्यात जमा होत असल्याने बर्याच संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तरी याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन महिन्याच्या सुरुवातीला सेवानिवृत्ती वेतन धारकाच्या खात्यात जमा करावे ही आग्रहाची मागणीसाठी सेवानिवृत्त कर्मचारी अध्यक्ष महम्मद हमिदोदीन, उपाध्यक्ष दता वाघमारे, ग्यानोबा मंगनाळे,सचिव शंकर गोरे,एस.आर. कुलकर्णी,ना.गो.पटणे,गुलाम मुख्तार,रवींद्र जोशी,महम्मद सलीम, डी.के.शेंबाळे,विश्वनाथ पांगरेकर,आर. बी.गायकवाड,डी.टी.मोटभरे, भीवाजी ढवळे,शेख युसुफ,एन.जे.एलमेवाड,पंढरी कदम, तुकाराम चिवळे,जे.एफ.पठाण,हबीब चाऊस,हाशम पाशा,देविदास कांबळे, मिरासाब,परसुराम शिखरे यांच्या सह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
या उपोषणाला गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर ,ग्रामविस्तार अधिकारी गुठे,संबंधीत कर्मचारी धोंडगे यांनी भेट आदोंलन कर्त्यांना भेट दिली.