जिल्हा परिषद हायस्कूल, मालेगाव ता. अर्धापूर येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षक तथा महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सन्माननीय सदस्य व मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र अभ्यासक मंडळाचे सदस्य शिवा कांबळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “मिशन आपुलकी” या उपक्रमांतर्गत”द्या एक पुस्तक आमच्यासाठी”या उपक्रमाच्या माध्यमातून जमा केलेली २३७ पुस्तके आणि शिवा कांबळे यांचे कडून ५१ पुस्तके अशी एकूण २८,४८४/- रुपयाची ग्रंथसंपदा नांदेड जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षा अभियान विभागातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे यांच्या शुभहस्ते वाघी प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश बादशहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या ग्रंथ दान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश बादशहा हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे,राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. हेमंत कार्ले,या उपक्रमाचे संयोजक आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांची उपस्थिती होती.
शिवा कांबळे हे गेली बत्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात अत्यंत निष्ठापूर्वक आणि अव्याहतपणे विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी काम करत आहेत. शिवा कांबळे यांची नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळख असून शिवा कांबळे यांनी आज पर्यंत विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून
आजही त्यांच्या विविधांगी उपक्रमात
सातत्य असल्याचे गौरवोद्गार डॉ. विलास ढवळे यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. हेमंत कार्ले यांनी मानले.यावेळी प्रशालेतील शिक्षक सुदर्शन बिंगेवार,रावसाहेब देवकते, विठ्ठल पवार, बालाजी गीते,विलास झोळगे,बालाजी क्षीरसागर,रामदास अलकंटवार, ऋषिकेश ढाके,आर.एस. गोटे,आर.पी.शेळके,जयश्रीताई वडगावकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत वागरे,नामेवार,पुष्पा बिरादार यांनी परिश्रम घेतले.