पाताळगंगा -उम्रज -दगडसांगवी रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदाराचे बिल काढु नका -बालाजी चुकलवाड यांचा इशारा
कंधार ; प्रतिनीधी
कंधार तालुक्यातील रस्त्याची अवस्था दैनिय झाली आहे.ग्रामीण भागात जाण्यासाठी निट रस्ता नसल्याने नागरीकांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे.काही ठिकाणी रस्ते होतात परंतु गुत्तेदार हे बोगस कामे करत असल्याने तिनते चार महिन्यातच रस्ते खराब झाल्याचे प्रकार अनेक गावात घडलेआहेत.पाताळगंगा-उम्रज-दगडसांगवी हा दिड किलो मिटरच्या रस्त्याचे काम झाले आहे.सदरील गुत्तेदार हा लोकप्रतिनीधीचा पुतन्या असल्याने रस्त्याचे काम अत्येत निकृष्ट दर्जाचे केले आहे.त्यामुळे या कामाची गुणनियंत्रक विभागाकडुन करण्यात यावी तसेच चौकशी होई पर्यंत संबंधित गुत्तेदाराचे बिल देण्यात येऊ नये अन्यथा वाईट परिणाम होतील अशा सज्जड माजी सैनिक बालाजी चुक्कलवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदनाव्दारे दिला आहे.
कंधार तालुक्यातील राजकीय नेतेच गुत्तेदार बनले असल्याने रस्त्याची कामे बोगस होत आहेत.ग्रामीण भागात जिल्हा परिषद अंतर्गत झालेले रस्ते तर सर्रास बोगस झाले आसुन काही महिन्यातच या रस्त्याचा धुरुळा झाला आहे.कंधार तालुक्यातील काही जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य हे स्वता गुत्तेदारी करत आहेत तर काही त्याचे नातेवाईक गुत्तेदारी करीत असल्याने तालुक्यातील झालेले सर्वच रस्ते बोगस झाले आहेत.उमरज येथे संत नामदेव महाराज यांचे प्रसिद्ध देवस्थान आहे. असे असताना ही पाताळगंगा -उमरज-दगडसांगवी हा दिड किलो मिटरचा रस्त्या गेल्या अनेक वर्षापासुन खराब झाला होता.या रस्त्या आता कुठे तरी योग आला असुन या रस्त्याचे काम झाले आहे.सदरील रस्त्याचे काम करणारे गुत्तेदार हे लोकप्रतिनीधीचे पुतने असल्याने रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या बोगस कामामुळे काही महिन्यातच हा रस्ता उखळुन जाणार आहे.त्यामुळे सःबधीत गुतेदार हा कोणाचा ही नातेवाईक असला तरी त्या कामाची चौकशी गुणनियंत्रन विभागाकडुन करण्यात यावी व काम उत्कृष्ट झाल्या शिवाय त्या गुत्तेदाराचे बिल काढण्यात येऊ नये अन्यथा याचे परिणाम वाईट होतील असा सज्जड इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदनाव्दारे दिला आहे.