कंधारः- शंकर तेलंग
लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव तथा अध्यक्ष श्री सुधाकररावजी तेलंग साहेब यांना मानव संसाधन व मनुष्यबळ विकास मंञालय (NIEPA) चा 2019-20 चा ” नाविण्यपुर्ण व गतिमान प्रशासन शैक्षणिक पुरस्कार जाहिर झाला त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा शैक्षणिक संघटनेकडून मा.श्री तेलंग साहेब यांचा सापत्नीक सत्कार करण्यात आला.
नांदेड जिल्ह्याच्या या भूमिपुञाने राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळवला ही अभिमानास्पद बाब असल्यामुळे या सत्काराप्रसंगी प्रा. मुकुंद बोकारे ,प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे ,संस्थाचालक दिलीपरावजी धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षक बंधू – भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी सत्कारास उत्तर देतांना श्री.सुधाकररावजी तेलंग यांनी जीवनाच्या शैक्षणिक प्रगतीचा व प्रशासकीय अनुभवाचा संपूर्ण लेखाजोखा मांडला.ते म्हणले नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असतांना कठोर परिश्रमाने स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचा मुलमंञ त्यांनी सुचविला,त्यानंतर शिक्षणाधिकारी म्हणून कार्य करताना कार्यालयातील कामाचे विभाजन आणि नियोजन तसेच नाविन्य उपक्रम ज्यात गुगलफाॕर्मचा वापर करून प्रलंबित प्रकरणाचे निपटारे , पेन्शनर्ससाठी आठ महिने अगोदर प्रस्तावांची छानणी आणि निवृत्तीधारकांना सन्मानाचा एक कप चहा , अधिकारी आपल्या दारी शिक्षक दरबारी , ग्रहणाच्या निमित्ताने दहा हजार विद्यार्थ्यांसमवेत ग्रहणसूर्योत्सव अभियानाचे आयोजन , कोविड काळातील मुख्याध्यापकांशी अभासी झूम मिंटींगचे आयोजन , ग्रामीण भागातील तसेच दुर्गम वस्तीतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बोर्ड आपल्या दारी ही सृजनशील संकल्पना यशस्वीरीत्या राबवली .
याच उपक्रमशीलतेची दखल केंद्र शासनाने घेऊन पहिल्या सात गुणवंतात श्री तेलंग साहेब यांची निवड केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दिलीपराव धर्माधिकारी ,प्रमुख पाहुणे प्रतापराव भंडारी (लेखाधिकारी,नांदेड) , श्री पांचगे साहेब (अधिक्षक पे-युनिट) , कार्यक्रमाचे संयोजक प्रा.मुकुंद बोकारे ,प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे ,प्रा.संभाजी वडजे, प्रा.विलास वडजे, प्रा.विजय कदम , डॉ.विनायक देव ,प्रा.संदिप पा. बेटमोगरेकर ,प्रा.महेश देशमुख, प्राचार्य व्यंकट वाघमारे , सौ.आल्लडवाड मॕडम आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.संदिप बेटमोगरेकर तर कार्यक्रमाचे संचलन प्रा.विजय कदम यांनी केले .तसेच सर्वांचे आभार संयोजक प्रा.मुकुंद बोकारे यांनी मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.