फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमाच्या आणाभाका सुरू होतात? 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत दररोज एक डे साजरा केला जातो, इतर देशांचे अनुकरण करून हा दिन सध्या आपल्या देशात सुरू झाला आहे, काही लेखकांनी प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असे रोखठोकपणे म्हटले आहे, एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्यामध्ये एकच भावना असते असे नाही, प्रेमामध्ये शारीरिक आकर्षणा सोबतच विश्वास, काळजी,आपुलकी, समजूतदारपणा ,मोकळीकता एकमेकाचा आधार अशा अनेक भावनांचे मिश्रण असते, सध्या इंटरनेट ने अनेक जणांना जोडलेले आहे त्यामुळे साधा फोटो टाकला तरी ताबडतोब मिळणारा आनंद हवा असतो, एकाच माणसाची अनेक जण तासंतास बोलत आहेत त्याचे दूरगामी परिणाम घडून येत आहेत, वेळ वाया जात आहे,
आजची तरुणाई प्रेमासाठी आंधळी झालेली दिसून येत आहे,एका मुलाची दुसऱ्या देशातील मुली सोबत मैत्री झाली, अक्षरशः तो मुलगा त्या देशात पोहोचला,असेही काही उदाहरणे आहेत,एखाद्याकडे गाडी, बंगला, संपत्ती असली की लगेच त्यांच्या सोबत मैत्री वाढवायची आणि त्याचे रूपांतर प्रेमात करायचे, काही दिवसानंतर संशयी वातावरण निर्माण झाले की सोडून द्यायाचे, दुसऱ्या व्यक्तीवर परत प्रेम करण्यासाठी हेलपाटे मारायचे हे अगोदरच ठरवून घ्यावं, प्रेम एखाद्याच्या सौंदर्यावर की संपत्तीवर करावं,की किंवा भावनेवर करावं हे अगोदर कळावं, काही व्यक्ती प्रेमात पागल झाले आहेत,
अगोदरचा काळ वेगळा होता, प्रेमात जर जोडीदाराने दुस-या सोबत विवाह केला तर आयुष्यभर काही व्यक्ती अविवाहित राहत होते, त्याला खरं प्रेम म्हणावं ,प्रेम म्हणजे फक्त लोकसंख्या वाढविणे नव्हे, प्रेम करते वेळेस काही मनुष्यानी लैंगिकता हाच विषय पुढे आणला आहे, पण ते तसे नाही किती जणांचे वय संपले तरी प्रेम काय असतं हेच त्यांना कळाले नाही ही शोकांतिका आहे, प्रेम कसे असावे याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे सांगता येतात, स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीवर खरे प्रेम केले. आपली संस्कृती इतर संस्कृतीपेक्षा कशी दर्जेदार आहे हे शिकागोच्या धर्मपरिषदेत सांगितले,
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी वैज्ञानिक संशोधनावर खूप प्रेम केले, स्वतः आयुष्यभर अविवाहित राहिले, त्यांच्याकडे किती मोठा त्याग होता याचा विचार करावा,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांवर प्रेम केले, करोडो लोकांना ज्ञानाकडे नेण्याचे महान कार्य केले, आणि संविधानाचे शिल्पकार झाले ,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर प्रेम केले. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी तंबी सैनिकांना दिली होती, राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या दरबारातील सर्व लोकांवर समानतेने प्रेम केले, सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली, संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेवर प्रेम केले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी विद्येवर प्रेम करून निरक्षर लोकांना सुशिक्षित केले, हुतात्मा भगतसिंग, राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बाबू गेनू हुतात्मा शिरीषकुमार, वि, दा सावरकर महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांनी आपल्या मातृभूमीवर प्रेम केले म्हणून प्रेम हे कोणत्या गोष्टीवर करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
आजची परिस्थिती फारच बदलली आहे.अनेक जणांकडे संयम राहिला नाही. एकमेकावरील विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे प्रेमाची थट्टा सुरू झाली. एकतर्फी प्रेमातून मुलीचे जीव धोक्यात येत आहेत, मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत, आणि अनेक मुली वासनेच्या शिकारी बनत आहेत, नातेवाईक सुद्धा कळेनाशी झाले आहेत, पवित्र नात्याला काळीमा फासत चालला आहे,म्हणून प्रेमाची व्याख्या अगोदर समजून घ्यावी
कलाकारांनी कलेवर प्रेम करावं,
शिक्षकांनी अध्ययन व अध्यापनावर प्रेम करावं, नेत्यांनी जनतेच्या विकास कामावर प्रेम करावं, तेव्हा प्रेम आंधळ नसतं ते डोळस असतं परंतु ते कळावे लागते, संपादकांनी जनतेच्या मनातील आक्रोश बाहेर काढून समानता, बंधूंभाव ,स्वातंत्र्य सर्वधर्मसमभाव या नीतिमूल्यांवर प्रेम करावे. न्यायालयानी गुन्हेगारांना शिक्षा द्यावी, मालकांनी नोकरदारावर प्रेम करावे ,साधुसंतांनी सुद्धा म्हटले आहे ,दया करणे जे पुत्राशी ।तेच दास आणि दासी ।।सेनापतीने आपल्या सैनिकावर प्रेम करावे, पहा बरे काय फरक पडतो,
प्रत्येकांनी आपल्या कर्तुत्वावर प्रेम करावे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी संताजी घोरपडे व धनाजी जाधव वर प्रेम केले होते,
संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वावर प्रेम केले, हनुमानाने श्रीरामावर प्रेम केले होते, हे निखळ प्रेमाची उदाहरणे आहेत, देवांचा देव श्रीकृष्णाने त्यांचा मित्र सुदामा यांच्यावर जीवापाड प्रेम केले होते ,कधी त्यांच्या मनात वाईट बुद्धी आली नाही शेवटपर्यंत मित्रप्रेम टिकून राहिले.
श्रीराम 14 वर्षे वनवासाला गेल्यामुळे भरताने व शत्रुघनाने अयोध्याचे राज्य संभाळले, म्हणून प्रेमाचे अनेक उदाहरण देता येतात शारीरिक प्रेम वेगळे आणि भावनिक प्रेम वेगळे, भावनेची भाषा भावनेला कळाली की प्रेम होते ,मागील काळामध्ये हीर-रांझा, बाजीराव- मस्तानी रोमियो-ज्यूलियट यांच्या जोड्या प्रसिद्ध होत्या, त्या शेवटपर्यंत निभावल्या ,अलीकडे मानवी जीवन सैराट झाले ,सैराट सर्वाना माहीतच आहे, आपली समाजव्यवस्था आपण या सगळ्यांचा विचार करूनच प्रेम करायचे असते ,प्रेमामध्ये चूक झाली तरी माफी असावी पण ती मुद्दाम होऊन चूक करू नये या दिवसाच्या निमित्ताने फक्त मुला- मुलीना प्रेमाचीच आवश्यकता आहे,असे नसून मानव जात प्रेमासाठी पात्र आहे ,
आपण सर्वांनी एक होऊन आपला देश आपली संस्कृती आपले आई-वडील या सर्व गोष्टीवर प्रेम केल्यास आपल्याला काही कमी पडणार नाही, आपण इतरांचे अनुकरण करून एक दिवसा पुरते नाटक करू नये, दररोज आपण चांगलं वागून प्रेमाने राहून आपले आयुष्य कंठीत करावे खरंच उद्याचा आपला देश प्रेमाने बांधला जाईल, आणि एके दिवशी महासत्ता होईल,यात अजिबात शंका नाही,त्या साठी फक्त प्रेमाची नितांत आवश्यकता आहे,
साहित्यिक
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड