ग्रामिण रुग्णालयात ताणतणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर ; कंधारचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी

श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय,नांदेड
जिल्हा मानसिक आरोग्य सेवा प्रेरणा प्रकल्प अंतर्गत आज मंगळवार दि.१५ फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे ताणतणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिरात ५० रुग्णांची तपासणी करण्यात आली अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ सुर्यकांत लोणीकर यांनी दिली.

यावेळी संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
उपस्थित मानसोपचार तज्ञ डॉ. शाहू शिराढोणकर यांनी एकूण 50 रुग्णांची तपासणी करून औषध उपचार व मार्गदर्शन केले.

समुपदेशन परिचारिका सुधा टेकुळे ,सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जयश्री गोरडवार , कंधार ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मीनारायण पवार ,डॉ. महेश पोकले ,
डॉ.दत्तात्रय गुडमेवार ,
डॉ. प्राजक्ता बंडेवार , डॉ निकहत फातिमा , अधिपरिचारिका श्रीमती पार्वती वाघमारे , श्रीमती आऊबाई भुरके
,अरविंद वाठोरे ., दिलीप कांबळे औषध निर्माण अधिकारी, प्रशांत कुमठेकर , निमिषा कांबळे , चंचल गवाले,अशोक दुरपडे, याप्रसंगी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *